जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुशांत आता आमच्यामध्ये असता तर..' 'छिछोरे'च्या दिग्दर्शकाने सांगितली मनाला चटका लावणारी गोष्ट

'सुशांत आता आमच्यामध्ये असता तर..' 'छिछोरे'च्या दिग्दर्शकाने सांगितली मनाला चटका लावणारी गोष्ट

'सुशांत आता आमच्यामध्ये असता तर..' 'छिछोरे'च्या दिग्दर्शकाने सांगितली मनाला चटका लावणारी गोष्ट

छिछोरे चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासारखा प्रतिष्ठेचा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण या क्षणी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला अभिमान वाटतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : वर्ष 2019 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘छिछोरे’ (Chhichhore) या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) हा शेवटचा चित्रपट होता. या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी (Chhichhore director Nitesh Tiwari ) यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, त्यांनी हा पुरस्कार मिळाला असला तरी आपल्यासोबत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा सुशांत नसल्याने खूप नाराज असल्याची भावना व्यक्त केली. नितेश तिवारी म्हणाले की, “छिछोरे चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासारखा प्रतिष्ठेचा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण या क्षणी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला अभिमान वाटतो. ‘छिछोरे’च्या संपूर्ण टीमचे या निमित्ताने कौतुक करतो. मात्र, माझ्या अंत: करणात कुठेतरी खोल दुःखद भावना आहे. नितेश तिवारी पुढे म्हणाले की, “हे आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी यावेळी सुशांत सिंग राजपूत देखील आमच्यामध्ये असता तर मला खूप आनंद झाला असता.” हे वाचा -  चाचा, चाचा बस हो गया…रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला पाहून काकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल ‘छिछोरे’ चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला या प्रसंगी म्हणाले, “नडियाद गंडसन एंटरटेनमेंट (एनजीई) च्या संपूर्ण टीमच्या वतीने, मी सुशांत सिंह राजपूतला हा प्रतिष्ठित पुरस्कार समर्पित करू इच्छितो. आम्ही अजूनही तो दुख:द प्रसंग विसरू शकलेलो नाही. पण मी प्रार्थना करतो की, या पुरस्काराच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला आणि त्यांच्या चाहत्यांना थोडा अधिक आनंद वाटेल. आपल्या सर्वांसाठी एक अतिशय खास चित्रपट बनवल्याबद्दल मी नितेश तिवारी यांचा नेहमीच ऋणी राहीन.” ‘छिछोरे’मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मित्राची महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ताहिर राज भसीननेही यावेळी सुशांतची आठवण काढली. हे वाचा -  23 व्या वर्षी केली 40 रुपयांची चोरी; 42 वर्षांनंतर कोर्टाकडून निर्दोष सुटका, नागपुरातील फिल्मी स्टोरी तो म्हणाला, “यावेळी आपण हा मोठा विजय साजरा करत आहे, पण हा विशेष प्रसंग सुशांतची आठवण ठेवण्याचा आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. कारण त्याच्याशिवाय या चित्रपटाची कथा सांगणे शक्य नव्हते.” 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात