जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नॅशनल अवॉर्ड अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण; मदतीसाठी ओरडत राहिली, लोक करीत राहिले Video

नॅशनल अवॉर्ड अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण; मदतीसाठी ओरडत राहिली, लोक करीत राहिले Video

नॅशनल अवॉर्ड अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण; मदतीसाठी ओरडत राहिली, लोक करीत राहिले Video

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भुवनेश्वर, 24 जुलै : नॅशनल अवॉर्ड विजेती ओडिया अभिनेत्री प्रकृति मिश्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अभिनेत्रीला मारहाण झाल्याचंही समोर आलं आहे. मारहाण करणारीदेखील एक महिला असून ही अभिनेत्रीच्या सहकलाकाराची पत्नी तृप्ती आहे. मोहंतीने नुकतच प्रकृतीसह ओडिया चित्रपट प्रेमममध्ये काम केलं होतं. आणि आपल्या पतीचा त्याच्या सहकलाकाराबरोबर अफेअर असल्याचा संशय होता. भुवनेश्वरच्या गर्दीच्या ठिकाणी झालं भांडण… मोहंतीची पत्नी आणि प्रकृतिमध्ये रस्त्यावर भांडण सुरू होतं. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. कथित व्हिडीओमध्ये मोहंतीची पत्नी तृप्तीने आपला पती आणि अभिनेत्रीला कारमध्ये एकत्र पकडलं. यानंतर ती मारहाण करताना दिसली. जेव्हा प्रकृती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती, तर तृप्तीने तिचे केस पकडण्याचा प्रयत्न केला. तिने प्रकृतीला रिक्षेत बसण्यापासूनही रोखलं आणि तिच्यावर कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा आरोप लावला. दुसरीकडे प्रकृती इशार करीत होती, की, तृत्पीचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. घटनेच्या काही तासानंतर प्रकृतीची आई कृष्णाप्रिया मिश्राने खारवेला नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भुवनेश्वर डीएसपी प्रतीक सिंह यांनी सांगितलं की, काही जणांनी प्रकृती मिश्राची गाडी थांबवली आणि तिला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला. त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.

जाहिरात

प्रकृतीने सांगितलं की.. प्रकृतीने आपल्या जबाबात सांगितलं की, प्रत्येक कथेचे दोन पैलू असतात. दुर्देवाने आपण अशा समाजात राहतो जेथे ऐकण्यापूर्वीच आपण महिलेला दोष देतो. मी आणि माझा सहकलाकार बाबूनाथ चेन्नईतील एक कार्यक्रमासाठी जात होतो, यादरम्यान बाबूनाथची पत्नी काही गुंडासोबत आली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला. या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असा मला  विश्वास आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: actor
  • First Published :
जाहिरात
जाहिरात