Home /News /entertainment /

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

राजकीय वादांवर का बोलत नाहीत बॉलिवूडमधले तीनही खान्स? नसिरुद्दीन शाहांचा सवाल

भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडच्या तीन खान्सला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

    मुंबई, 09 जून:  भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. भरपूर टीकाही झाली.आखाती देशांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नूपुर शर्मा यांची भाजपमधून हकालपट्टीही झाली; पण या विषयावर अजूनही चर्चा सुरुच आहे. या वक्तव्यावर चित्रपट क्षेत्रातून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. आता ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. चित्रपटसृष्टीतले तीन खान म्हणजेच शाहरुख (Shahrukh), सलमान (Salman) आणि आमीर खान (Aamir Khan) यांच्यावर विशेष भर देऊन नसिरुद्दीन शाह यांनी 'एनडीटीव्ही'ने घेतलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. त्याचप्रमाणे चित्रपटक्षेत्र या घटनेबद्दल बाळगून असलेल्या मौनाबद्दलही ते बोलले आहेत. 'द इंडियन एक्सप्रेस'ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. “मी त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या वतीने बोलू शकत नाही. ते ज्या स्थानावर आहेत तिथे मी नाही. कदाचित आपण काही बोलणं म्हणजे खूप मोठा धोका पत्करणं असल्यासारखं आहे, असं त्यांना वाटत असेल; पण ते स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला कसं पटवून देत असतील हे मला माहिती नाही. कदाचित त्यांच्याकडे खूप काही गमावण्यासारखं आहे असं त्यांना वाटत असेल,” असं नसिरुद्दीन शाह या तिघांबद्दल म्हणाले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याला झालेली अटक म्हणजे जाणीवपूर्वक दिलेला त्रास (Witch Hunt) होता, असं वक्तव्यही त्यांनी केलं. “शाहरुख खानबद्दल काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे; पण त्याने ते ज्या तऱ्हेने हाताळलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे. ते दुसरं तिसरं काहीही नसून फक्त Witch Hunt चा प्रकार होता. तो तर काहीही बोलला नव्हता. त्यानं फक्त ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचं कौतुक केलं होतं. सोनू सूदलाही (Sonu Sood) छापेमारीला सामोरं जावं लागलं, ” असंही शाह म्हणाले. 'जो कोणी कोणत्याही प्रकारची वक्तव्यं करतो, त्याला त्याची फळं भोगावी लागतात. कदाचित पुढचा नंबर माझा असेल,' असं ते हसत हसत म्हणाले. “अर्थात त्यांना माझ्याकडे काहीही सापडणार नाही,” असंही ते म्हणाले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB म्हणजेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून अटक करण्यात आली होती. गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये ड्रग्जचा साठा सापडल्याप्रकरणी गेल्या वर्षी आर्यनला अटक करण्यात आली होती. त्याला जामीन मिळण्यापूर्वी काही आठवडे तुरुंगातही राहावं लागलं होतं. नुकतीच NCB ने आर्यन खान आणि अन्य पाच जणांना त्यांच्या आरोपपत्रात क्लीन चिट दिली आहे. पुरेशा पुराव्यांअभावी ही क्लीन चिट दिल्याचं सांगण्यात आलं. राष्ट्रहिताचे मानले गेलेले चित्रपट प्रोजेक्ट आणि त्यात सहभागी असलेले कलाकार, फिल्ममेकर्स यांबद्दलही शाह यांनी मत व्यक्त केलं आहे. “त्यांना कदाचित सध्याच्या विजयी बाजूलाच राहायचं असेल,” असं अक्षय कुमारच्या प्रोजेक्ट्सबद्दल शाह म्हणाले. “काश्मिरी हिंदूंवरच्या अत्याचारांचं अतिरंजित आणि कल्पित वर्णन या चित्रपटात आहे आणि सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे,” अशी प्रतिक्रिया विवेक अग्निहोत्रींच्या “द काश्मीर फाइल्स” या चित्रपटाबद्दल त्यांनी व्यक्त केली आहे. विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) आणखी एक तितक्याच वादग्रस्त, पण कमी यशस्वी ठरलेल्या ‘द ताश्कंद फाइल्स’मध्ये शाह यांनी अग्निहोत्रीसोबत काम केलं आहे. यापुढे भविष्यकाळात अशा प्रकारचं दिखाऊ देशप्रेम दाखविणाऱ्या चित्रपटांच्या संख्येत वाढ होणार असल्याची शक्यताही शाह यांनी व्यक्त केली.
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood actor, Bollywood News, Naseeruddin shah, Salman khan, Shahrukh khan

    पुढील बातम्या