जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हिंदी फिल्म इंडस्ट्रीने मला डिप्रेशनमध्ये टाकलं', ही प्रसिद्ध अभिनेत्री दोन वर्षापासून होती गायब

'हिंदी फिल्म इंडस्ट्रीने मला डिप्रेशनमध्ये टाकलं', ही प्रसिद्ध अभिनेत्री दोन वर्षापासून होती गायब

नरगिस फाखरी

नरगिस फाखरी

बॉलिवूडमधे असे अनेक कलाकार असतात जे अनेक चांगले चित्रपट देऊनही अचानक सिनेसृष्टीतून गायब होतात. बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर राहतात किंवा दूरावतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलिवूडमधे असे अनेक कलाकार असतात जे अनेक चांगले चित्रपट देऊनही अचानक सिनेसृष्टीतून गायब होतात. बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर राहतात किंवा दूरावतात. यातीलच एक नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी. आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने बॉलिवूडला भुरळ घालणारी नरगिस फाखरी गेल्या दोन वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब आहे. मसालाला दिलेल्या मुलाखतीत नरगिस फाखरीनं हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर असण्याचं कारण सांगितंलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरगिस चर्चेत आली आहे. मुलाखतीदरम्यान, नरगिस म्हणाली, मी इंडस्ट्रीत खूश नाही. बॉलीवूडमध्ये सलग 8 वर्षे काम केले आणि या दरम्यान त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळही मिळाला नाही. तणावामुळे मी आजारी पडू लागली. सततच्या तब्येतीच्या समस्यांमुळे मी डिप्रेशनमध्ये गेली की काय असा प्रश्न मला पडू लागला. मी नाखूष होती आणि ‘मी इथे का आहे’ असा प्रश्न मनात यायचा. अशा परिस्थीती मला सावरायला दोन वर्षे लागली.

जाहिरात

नरगिस पुढे म्हणाली, आता मला समजले की लोकांचे तीन चेहरे आहेत. पहिला व्यावसायिक चेहरा, दुसरा सर्जनशील चेहरा आणि तिसरा वास्तविक चेहरा. मला ज्या प्रकारची प्रसिद्धी हवी होती त्यासाठी मी बनलेले नाही. या कीर्तीने मला अनेकदा बुडवले आहे. तुम्हाला लोकांशी बोलायचे आहे, मग त्यांच्याशी बोलणे तुम्हाला सोयीचे आहे की नाही. तुम्हाला मुखवटा घालावा लागेल, ज्यासाठी मी तयार नव्हते.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, नरगिस लवकरच पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये ती रणबीर कपूरसोबत दिसली होती. यानंतर ती मद्रास कॅफे, ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटातही दिसली. तिने ‘स्पाय’मधून हॉलिवूडमध्येही काम केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात