जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Namrata Sambherao : 'तो आयुष्यात आल्यापासून सगळं भारीच होतंय'; नक्की कोणाबद्दल बोलतीये नम्रता?

Namrata Sambherao : 'तो आयुष्यात आल्यापासून सगळं भारीच होतंय'; नक्की कोणाबद्दल बोलतीये नम्रता?

Namrata Sambherao

Namrata Sambherao

नम्रता संभेराव ही अभिनेत्री शो असो किंवा नाटक कुठेही प्रेक्षकांना हसवण्यासाठी जीवतोड मेहनत घेते. ती सोशल मिडियावरही चांगलीच सक्रीय असते. नुकतेच तिने केलेल्या पोस्टची सध्या चर्चा होतेय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26  ऑगस्ट : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. ती तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरात आहेत. ती कधी लॉली  बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरी तिने अनेक नाटकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. ही नाटकं  हाऊसफुल ठरली आहेत. नम्रता शो असो किंवा नाटक कुठेही प्रेक्षकांना हसवण्यासाठी जीवतोड मेहनत घेते. आता तिला या मेहनतीचं फळ मिळाल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रताला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तिने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. झी टॉकीज कॉमेडी अवार्ड्स नुकतेच पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीतील हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार सोहळा असतो. खास विनोदी कलाकारांच्या कौतुकाची हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री नम्रता संभेराव हिने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा  पुरस्कार पटकावला आहे. तिने एक पोस्ट शेअर करत हि बातमी दिली आहे. विशेष म्हणजे तिला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री विशाखा सुभेदार सोबत विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे. हेही वाचा - Hemangi kavi : सुंदर आणि फिट दिसणाऱ्या हेमांगी कवीचं वय माहितेय का? अभिनेत्रीनं स्वतः केलं उघड नम्रताने पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित आणि प्रग्यास creation VR production निर्मित कुर्रर्रर्र ह्या नाटकासाठी मला zee talkies comedy awards चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला.. माझ्या आयुष्यातला मला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे आणि तो नाटकासाठी मिळाला आणि विशाखा ताईसोबत हा पुरस्कार मला विभागून दिला ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. कारण माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक नाव ताईच आहे.’ अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

तिने या नाटकाच्या सर्व टीमचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्राचा लोकप्रिय कलाकार प्रसाद खांडॆखर्चही तिने आभार मानले आहेत. कुर्रर्रर्र’ हे नाटक प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित आहे. तिने त्याचे आभार मानत लिहिलं आहे, ’thanks to पश्या हे पुरस्काराचं सुख तुझ्यामुळे माझ्या वाट्याला आलं’. तसेच प्रसादही यावेळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. पण या पोस्टमध्ये सर्वात लक्षवेधी ठरतोय ते नम्रताचा मुलगा. कारण तिने यावेळीही त्याचेही आभार मानले आहे. ती मुलाविषयी लिहिलंय कि, ‘माझं लेकरू रुद्राज माझा lucky champ, तो आयुष्यात आल्यापासून सगळं भारीच होतंय my power.. my strength’ नम्रताच्या या पोस्टवरवर सध्या प्रचंड लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील तिला शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात