जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याला विनयभंगप्रकरणी अटक

धक्कादायक प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याला विनयभंगप्रकरणी अटक

धक्कादायक प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याला विनयभंगप्रकरणी अटक

रिपोर्टर-ज्ञानेश्वर साळोखे मुंबई, 12 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. जितेंद्र पोळ असे संशयित अभिनेत्याचं नाव आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झालेल्या मुलीचा पोळ कडून विनयभंग करण्यात आल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आमच्या रिपोर्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयित अभिनेत्याची त्या मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यांनतर त्या अभिनेत्याने मुलीला लग्नाची गळ घातली. परंतु त्या मुलीने हा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर, संशयित आरोपी त्याचा सर्वत्र पाठलाग करू लागला.

  • -MIN READ
  • Last Updated :

रिपोर्टर-ज्ञानेश्वर साळोखे मुंबई, 12 फेब्रुवारी-   छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. जितेंद्र पोळ असे संशयित अभिनेत्याचं नाव आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झालेल्या मुलीचा पोळ कडून विनयभंग करण्यात आल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आमच्या रिपोर्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयित अभिनेत्याची त्या मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यांनतर त्या अभिनेत्याने मुलीला लग्नाची गळ घातली. परंतु त्या मुलीने हा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर, संशयित आरोपी त्याचा सर्वत्र पाठलाग करू लागला. तो सतत त्या मुलीवर पाळत ठेवत असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर ती मुलगी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊनसुद्धा त्रास दिल्याचं समोर आलं आहे. मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर या जितेंद्र पोळ संशयित अभिनेत्याने त्या मुलीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत लज्जास्पद वर्तवणूक केल्याचं गुन्ह्यात सांगण्यात आलं आहे. आज सकाळी कोल्हापुरातील राजाराम पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी त्याला अटक केल्याचं समोर आलं आहे.रात्री उशिरा या संशयितावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो एका प्रसिद्ध मालिकेत काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tv actor
  • First Published :
जाहिरात
जाहिरात