या फिल्मचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे की, फँड्री, सैराट आणि नाळच्या यशानंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत ‘घर,बंदूक, बिर्याणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे वाचा - 'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेची पत्नी आहे फारच सुंदर; अशी झाली होती भेट! टिझरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या फिल्ममध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर यांची भूमिका असणार आहे. नागराज मंजुळेही या फिल्ममध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत अवताडे यांनी लिहिली आहे. ए.व्ही.प्रफुलचंद्र यांनी संगीत दिलं आहे. तर प्रसिद्ध हिंदी गायक मोहीत चौहानच्या आवाजातील ट्रॅक लक्ष वेधून घेत आहे. नागराज यांच्यासह निर्माता म्हणून भूषण मंजुळे यांचाही सहभाग आहे. 2022 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे. हे वाचा - Zee marathi awards: मराठमोळ्या कलाकारांचा रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाज पाहिला का? नाळ, फ्रँड्री, हायवे असे उत्तम चित्रपट नागराज मंजुळेंनी साकारले आहेत. सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले होते. सैराट सिनेमातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाचं लेखन, संवाद अतिशय उत्तम दर्जाचे होते. सैराटचं संगीत आजही चाहत्यांच्या तोंडावर आहे. सैराटचा हिंदीतही रिमेक झाला होता. नागराज यांनी 'कोण होईल मराठी करोडपती' या शोचं सूत्रसंचालनही केलं होतं. नेहमीच काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करून दाखवणाऱ्या या दिग्दर्शक आणि अभिनेत्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.