• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेची पत्नी आहे फारच सुंदर; अशी झाली होती पहिली भेट!

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेची पत्नी आहे फारच सुंदर; अशी झाली होती पहिली भेट!

अभिनेता आणि होस्ट निलेश साबळे आज संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कलाकार बनला आहे.

 • Share this:
  मुंबई, 15ऑक्टोबर- 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) कार्यक्रमाने अख्ख्या महाराष्ट्राला हसवून लोटपोट केलं आहे. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' म्हणत डॉ. निलेश साबळेने (Nilesh Sabale) कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलली आहे. आपल्या अचूक विनोदीवृत्तीने त्याने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. हे झालं व्यवसायिक. मात्र निलेश साबळेच्या खाजगी आयुष्याबद्द्दल जाऊन घेण्याची त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. निलेश साबळेच्या पत्नीबद्दल (Nilesh's Wife) जणूं घ्यायची अनेकांना इच्छा असते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. अभिनेता आणि होस्ट निलेश साबळे आज संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कलाकार बनला आहे. आज महाराष्ट्रातील गल्लोगल्ली त्याला ओळखलं जात. आपल्या सेन्स ऑफ ह्युमरच्या जोरावर त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. 'चला हवा येऊ दया' कार्यक्रमामध्ये त्याने टीमचं नेतृत्व करत एक यशस्वीगाथा लिहिली आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराला या कार्यक्रमात येण्याची इच्छा असते. अशा या निलेश साबळेने 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून. मात्र निलेशसाठी हा प्रवास तितका सोपा नव्हता. डॉक्टरची पदवी घेऊनही निलेशने अभिनयाच्या आवडीसाठी या क्षेत्रात कष्ट घेतले. यामध्ये तिला तिच्या कुटुंबियांची आणि पत्नी गौरीची मोठी साथ मिळाली होती. निलेश साबळे इतका लोकप्रिय असूनही त्याची पत्नी मात्र नेहमीच लाइमलाईटपासून दूर असते. निलेशसुद्द्धा सोशल मीडियावर फारसा सक्रिय दिसत नाही. त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे फोटोसुद्धा तितकेसे पाहायला मिळत नाहीत. किंवा त्यांच्या अपडेट्ससुद्धा आपल्याला मिळत नाहीत. मात्र एक गोष्ट फारच रंजक आहे. ती गोष्ट म्हणजे निलेश आणि गौरीची लव्हस्टोरी. या दोघांची लव्हस्टोरी अगदी फिल्मी आहे. अनेकांना यांच्या नात्याचा हेवा वाटतो. निलेश आणि गौरीने प्रेमविवाह केला होता. या दोघांची ओळख कॉलेजमध्येच झाली होती. खरं सांगायचं तर हे दोघे एका कॉलेजमध्ये नव्हते. मात्र एका कार्यक्रमानिमित्त निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. (हे वाचा:लखलखतं सोनं! रिंकूने नेसली आज्जीची साडी; दिल्या विजयादशमीच्या गोड शुभेच्छा) यावेळी दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीनंतर निलेश आणि गौरीमध्ये मैत्री झाली होती. हे दोघे एकेमकांचे खास मित्र बनले होते. कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. नंतर या दोघांनी लग्नसुद्धा केलं. आता या दोघांच्या संसाराला जवळजवळ १०-११ वर्षे झाली आहेत. नात्याच्या सुरुवातीलाच निलेशने गौरीला सांगितलं होतं की आपल्याला या वैद्यकीय क्षेत्रात अजिबात रस नाही आपल्याला अभिनयाचं वेड आहे. त्यानंतर गौरीने त्याला प्रत्येक निर्णयात साथ देण्याची कबुली दिली होती. आणि गौरीने हे तंतोतंत सत्यात उतरवलंदेखील आहे. तिने निलेशच्या प्रत्येक पावलावर त्याला साथ दिली आहे. गौरी दिसायलाही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
  Published by:Aiman Desai
  First published: