जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nagraj Manjule: पैलवान खाशाबा जाधव यांचा जीवनपट दिसणार पडद्यावर; नागराज मंजुळेंची मोठी घोषणा

Nagraj Manjule: पैलवान खाशाबा जाधव यांचा जीवनपट दिसणार पडद्यावर; नागराज मंजुळेंची मोठी घोषणा

नागराज मंजुळें

नागराज मंजुळें

Nagraj Manjule Upcoming Movie: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे होय. या दिग्दर्शकाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिलीय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 फेब्रुवारी- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे होय. या दिग्दर्शकाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिलीय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. चित्रपटांतील साधेपणा, विषयातील गंभीरता आणि मातीतील कलाकार या मिश्रणामुळे त्यांचा सिनेमा प्रेक्षकांना जवळचा वाटतो. नागराज मंजुळे नेहमीच वेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दरम्यान आता दिग्दर्शक एका दमदार व्यक्तीच्या बायोपिकसह भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे लवकरच पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार आहेत. नागराज मंजुळे आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. ते नेहमीच नवनव्या विषयांवर चित्रपटांची निर्मिती करत असतात. त्यांचे विषय अगदी समाजाच्या तळागाळातील विषयांवर आधारित असतात. प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांची नेहमीच आतुरता लागून असते. दरम्यान नागराज मंजुळे आपल्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिग्दर्शकाने नुकतंच एका कार्यक्रमात या सिनेमाची घोषणा करत आनंदाची बातमी दिली आहे. (हे वाचा: Nagraj Manjule: …अन धूर यायला लागला; नागराज मंजुळेंनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील ‘तो’ किस्सा ) पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शकाने कुस्तीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून या सिनेमाची घोषणा करत सर्वांनाच खुश केलं आहे. नुकतंच महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यात वसलेल्या उमळवाडमध्ये कुस्ती स्पर्धेचं जंगी नियोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दिग्दर्शक नागराज मंजुळे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जाहिरात

या निकाली कुस्तीच्या जंगी कार्यक्रमातच नागराज यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत सर्वांनाच खुश केलं आहे. नागराज मंजुळेंनी आपण येत्या काळात पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करत असल्याचं सांगितलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

खाशाबा जाधव यांचं नाव प्रत्येक व्यक्तीला पाठ आहे. पैलवान खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये भारताला पहिलं ऑलम्पिक मेडल मिळवून दिलं होतं. या कुस्तीपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव चमकवलं होतं. त्यांच्या आयुष्यपट मोठ्या पडद्यावर आणायचा निर्णय नागराज मंजुळेंनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने कुस्तीप्रेमी आणि प्रेक्षक प्रचंड खुश आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात