मुंबई, 5 फेब्रुवारी- 96 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच 17 वा विद्रोही मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात पार पडत आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनेक ज्येष्ठ कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये मराठीचे दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, किशोर कदम आणि लोकप्रिय लेखक अरविंद जगताप यांनी आपले अनुभव शेअर केले. नागराज मंजुळेंनी यावेळी लंडनमधील आपला एक किस्सा सांगितला जो सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
असं म्हटलं जातं की नागराज मंजुळे आपल्या कामातून बोलतात. अर्थातच ते अत्यंत शांत आणि मितभाषी आहेत. परंतु जेव्हा ते बोलतात तेव्हा खर्च काहीतरी रंजक असतं. यावेळीसुद्धा असंच काहीसं झालं आहे. नागराज मंजुळे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात लंडनमध्ये आपल्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितलं आहे. जो ऐकून लोक खळखळून हसत आहेत.
( हे वाचा: Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीने दिली GOOD NEWS? थेट टॉक शोमध्येच केलं जाहीर)
नागराज यांनी सांगितलं, 'ज्यावेळी मी पहिल्यांदाच लंडनला गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत एक मजेशीर प्रसंग घडला होता. भारतात असताना कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याचा योग घडून आला नव्हता. परंतु लंडनमध्ये गेल्यानंतर ते घडून आलं. मी आणि माझे दोन निर्माते मित्र आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आम्ही सकाळी -नाष्टा करुन चित्रपट महोत्सवासाठी बाहेर जात असे. माझे मित्र चहा बनवत असत. एके दिवशी सकाळी मित्र खोलीमध्ये आलेच नाहीत. त्यामुळे मी स्वतः चहा बनवण्याचा निर्णय घेतला.
त्या खोलीमध्ये चहा बनवण्यासाठी एक इलेक्ट्रिक टी मेकर होता. इलेक्ट्रिक टी मेकर मला हाताळता येत नव्हता. तरीही मी प्रयत्न म्हणून त्या मेकरमध्ये पाणी टाकलं प्लगसुद्धा जोडला आणि तो मेकर थेट उचलून शेगडीवर ठेवला. आणि मी चहा तयार होईपर्यंत व्यायामात लागलो. व्यायाम करताना माझं लक्ष शेगडीकडे गेलं, तर मला दिसलं त्या टी मेकरमधून प्रचंड धूर निघत आहे. धूर यायला लागल्यावर अचानक खोलीतील सायरन वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे मी प्रचंड घाबरलो.
सायरन वाजताच हॉटेलमधील स्टाफ पळत माझ्या खोलीत आले. त्यांनी काय घडलं याबाबत मला विचारलं असता माझी गोची झाली. कारण काय घडलं हे मला इंग्लिशमध्ये सांगता येणं शक्य झालं नाही. परंतु त्यांनी परिस्थिती पाहून सर्व समजून घेतलं. आणि मला नवीन टी मेकर आणून दिला. शिवाय त्यांनी मला इलेक्ट्रिक टी एमकर हाताळण्याची पद्धतदेखील दाखवली'. हा मजेशीर किस्सा ऐकून संमेलनात एकच हशा पिकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.