मुंबई, 21 एप्रिल: मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘सैराट’च्या माध्यमातून सर्वांनाच झिंगाट केलं आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती सुपरहिट ठरते. सैराटने तर चित्रपटसृष्टीत नवीन विक्रम केला. त्यानंतर या अस्सल मराठी दिग्दर्शकाने अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला. प्रत्येक चित्रपटाप्रमाणे याच्यावरसुद्धा कौतुकाचा वर्षाव झाला. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दक्षिणात्य कलाकारांनी या चित्रपटाचं कौतूक केलं. तर त्यांच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाला देखील समीक्षक ते प्रेक्षक सगळ्यांनीच चांगला प्रतिसाद दिला. एकूणच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. आता नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक नवीन कलाकृती आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता नागराज मंजुळे पुन्हा एक आगळावेगळा प्रयोग आपल्यासाठी घेऊन येत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. येणाऱ्या काळात नागराज मंजुळे लवकरच खाशाबा यांच्या आयुष्यावर चरित्रपटाची निर्मिती करणार आहेत. फँड्री, सैराट नंतर ‘खाशाबा’ हा नाराज मंजुळे दिग्दर्शित तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नागराज यांनी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलंय कि, ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावान पैलवान खाशाबांच्या आयुष्यावर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फँड्री, सैराट नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय’ असं नागराज यांनी लिहिलंय. तसेच पुढे ते म्हणतायत कि, ‘जियो स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फँड्री पासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल…! चांगभलं…!’ अशा भावना नागराज मंजुळेंनी व्यक्त केल्या आहेत. Video: हेमंत ढोमेनं अशोक मामांच ‘ते’ सुपरहिट गाणं केलं रिक्रिएट, रेट्रो लूकनं वेधलं लक्ष जियो स्टुडिओज अंतर्गत येणाऱ्या काळात तब्बल 100 चित्रपटांची निर्मिती होणार आहे. यामध्ये खाशाबा सोबतच श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या स्त्री 2 आणि वरून धवनच्या भेडिया 2 या चित्रपटांचा देखील समावेश आहे. या निर्मिती अंतर्गत सिनेरसिकांसाठी ही मोठी पर्वणीच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
नागराज मंजुळे यांच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, नुकतंच नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिर्यानी’ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नागराज मंजुळे स्वतः ऍक्शन करताना दिसून आले. तसेच यामध्ये सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी तगडी स्टारकास्ट होती. आता खाशाबा चित्रपटात नक्की स्टारकास्ट कोण असणार ही माहिती अद्याप समोर आली नसली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खुप उत्सुक झाले आहेत.