Home /News /entertainment /

VIDEO : एकता कपूरनं केली Naagin 5 ची घोषणा, पाण्यात घेतली ऑडिशन

VIDEO : एकता कपूरनं केली Naagin 5 ची घोषणा, पाण्यात घेतली ऑडिशन

प्रोड्युसर एकता कपूर नागिनच्या 5 व्या सीझनची ऑडिशन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई, 01 जानेवारी : टीव्हीवरील सुपरहिट शो नागिनचा 4 था सीझन काही दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. या नव्या सीझनमध्ये कलाकार तर नवे आहेतच पण त्यासोबतच कथा सुद्धा नवी आहे. नागिन 4मध्ये जस्मिन भसीन आणि निया शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण या दरम्यान या शो संबंधित एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात प्रोड्युसर एकता कपूर नागिनच्या 5 व्या सीझनची ऑडिशन घेताना दिसत आहे. एकता कपूरच्या व्हिडीओवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एकता कपूरनं हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्यानंतर काही वेळातच सगळीकडे व्हायरल झाला. या व्हिडीओच्या सुरुवातीला एकता नागिन 5 साठी ऑडिशन घेत असल्याचं सांगताना दिसते. त्यानंतर कॅमेरा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत असलेल्या अनिता हसनंदानी रिद्धीमा पंडित आणि करिश्मा तन्ना यांच्यावर स्थिरावतो. त्यानंतर या तिघींही नागिन डान्स करताना दिसतात. एकताचा हा धमाकेदार व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. एकता कपूरस, अनिता हसनंदानी, रिद्धीमा पंडित, करिश्मा तन्ना आणि विकास गुप्ता सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. शिल्पानं न्यू ईयरला मागितलं असं गिफ्ट, ऐकल्यावर नवरा झाला बेशुद्ध
  नागिन शोबद्दल बोलायचं तर या शोच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. नुकत्याच सुरू झालेल्या नागिनच्या 4 थ्या सीझनची सध्या सगिळीकडे चर्चा आहे. विशेष म्हणजे या सीझनची कथा इतर 3 सीझनपेक्षा पूर्णतः वेगळी असल्यानं प्रेक्षकांमध्ये या सीझनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. याशिवाय एकता कपूरनं तिचा सिनेमा ड्रीम गर्लच्या सक्सेसनंतर दिग्दर्शक राज शांडिल्यला लग्झरी कार भेट दिल्याचं बोललं जात आहे. वयाच्या 13 व्या वर्षी आयुष्यात आलेल्या वादळानं नाना पाटेकरांना शिकवला अभिनय इटलीमध्ये रोमँटिक झाली सोनम कपूर, शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक KISS VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या