मुंबई, 01 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या स्टाइल आणि फिटनेससाठी ओळखली जाते. सध्या शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी तिनं आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शिल्पा नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती पती राज कुंद्राकडे न्यू इयर गिफ्ट मागताना दिसत आहे. पण ती यात असं काही मागितलं की तिची मागणी ऐकून तिचा पती बेशुद्ध पडला. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याची को-स्टार भाग्यश्री यांचा सिनेमा ‘मैंने प्यार किया’ला 30 वर्ष पूर्ण झाले. शिल्पानं सलमान-भाग्यश्री या सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सिनेमातील गाणं ‘दिल दिवाना’वर एक व्हिडीओ तयार केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पानं लिहिलं, ‘अपेक्षा आणि सत्य. कलियुग आहे... या गोष्टीची मला अजिबात अपेक्षा नव्हती की, टिकटॉकवर 1 मिलियन फॉलोअर्स होतील आणि ते सुद्धा एका दिवसात’
इटलीमध्ये रोमँटिक झाली सोनम कपूर, शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक KISS VIDEO
या व्हिडीओमध्ये ती पती राज कुंद्रासाठी ‘मैंने प्यार किया’ मधील ‘दुनिया मांगे अपनी मुरादे…’ गाताना दिसत आहे. पण गाता गाता ती अशा गोष्टींची मागणी करते की राज तिच्या मागण्या ऐकून बेशुद्ध होतो. या व्हिडीओमध्ये ती गाडी, बंगला आणि डायमंड रिंग मागते. मैंने प्यार किया हा सिनेमा शिल्पाच्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे.
सुरज बडजात्याच्या दिग्दर्शनात तयार झालेला मैंने प्यार कियाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. हा सिनेमा एव्हरग्रीन सिनेमांच्या यादीत आहे जो आजही पहिला जातो. 1989 मध्ये हा सिनेमा 46 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता ज्याची आजची मार्केट व्हॅल्यू 350 कोटींपेक्षा जास्त आहे.
Fitness बाबत जागरुक असणाऱ्या तापसी पन्नूच्या दिवसाची 'अशी' होते सुरुवात
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची धर्मेंद्र यांच्याविरोधात कोर्टात धाव मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.