मुंबई, 09 एप्रिल : सध्या यूटयुबवर ‘मसक्कली 2.0’ हे गाणं ट्रेडिंग आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) या दोघांचा परफॉरमन्स पाहायला मिळाला. पण हे गाण सोशल मीडियावर फार ट्रोल होत आहे. ‘मसक्कली’ हे मूळ गाण ‘दिल्ली-6’ या चित्रपटातील असून त्यामध्ये अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर हे कलाकार दिसले आहे. या गाण्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचा रिमेक करणं अनेकांना पटलेले नाही आहे. मुळ गाण्याची गंमत या रिमेकमध्ये राहिलिच नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली आहे. या गाण्याचे संगीतकार ए.आर. रेहमान यांना देखील गाण्याचा रिमेक फारसा काही रुचलेला दिसत नाही आहे. त्यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे.
ए.आर. रेहमान यांनी ट्वीट करून मुळ गाणं एन्जॉय करण्याचा सल्ला दिला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘आम्ही या गाण्यासाठी कोणतेही शॉर्टकट घेतले नाही. पुन्हा-पुन्हा गाणं लिहून, 200 हून अधिक संगीतकारांशी चर्चा करून, अनेक रात्र जागून आणि 365 दिवस यावर काम करून असं गाणं तयार केलं जे पिढ्यानपिढ्या अजरामर राहू शकेलं.’ अशाप्रकारे रेहमान यांनी मुळ गाणं पाहण्याचा संदेश दिला आहे आणि नवीन गाण्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
तर मुळ गाण्याचे शब्द ज्यांनी लिहिले आहेत-प्रसून जोशी, यांनी देखील ट्वीट करून नवीन गाण्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘फॅन्स मुळ निर्मितीलाच पाठिंबा देतील’ असा विश्वास प्रसून जोशी यांनी आपल्या ट्वीटमधून व्यक्त केला आहे.
All songs written for #Delhi6 including #Masakali close to heart,sad to see when original creation of @arrahman @prasoonjoshi_ &singer @_MohitChauhan insensitively utilised. Upto the conscience of @Tseries. Hopefully the fans will stand for originality.
— Prasoon Joshi (@prasoonjoshi_) April 8, 2020
@RakeyshOmMehra
दरम्यान हे गाणं सोशल मीडियावर देखील खूप ट्रोल झाले आहे. अनेकांनी जुन्या गाण्यांचा रिमेक करण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला ‘दस बहाने’ या गाण्याचा रिमेक सुद्धा असाचा सोशल मीडियावर ट्रोल झाला होता.