ना सर्जरी ना ड्रग्ज... काय आहे मंदिरा बेदीच्या सौंदर्याचं रहस्य?

ना सर्जरी ना ड्रग्ज... काय आहे मंदिरा बेदीच्या सौंदर्याचं रहस्य?

मंदिराच्या बाबतीत हा प्रवास काहीसा उलटा दिसतोय. जसजसं तिचं वय वाढतंय मंदिरा आणखी लोकप्रिय होत चालली आहे. काय आहे मंदिराच्या सैंदर्याचं रहस्य?

  • Share this:

मुंबई 15 एप्रिल: मंदिरा बेदी (Mandira Bedi) ही भारतीय मनोरंजनसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखली जाते. तिनं मॉडलिंग, अभिनय, निवेदन, डान्स आणि आता फिटनेस कोच अशा विविध क्षेत्रात काम केलं आहे. आज मंदिराचा वाढदिवस आहे. 49 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाळीशी उलटल्यानंतर सर्वसाधारणपणे अभिनेत्रींचं करिअर संपुष्टात येतं असं म्हटलं जातं. याचा अनुभव बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्रींनी घेतला आहे. मात्र मंदिराच्या बाबतीत हा प्रवास काहीसा उलटा दिसतोय. जसजसं तिचं वय वाढतंय मंदिरा आणखी लोकप्रिय होत चालली आहे. काय आहे मंदिराच्या सैंदर्याचं रहस्य?

मंदिराचं गेल्या काही वर्षातील बदललेलं रुप पाहून सर्वच जण अचाट झाले आहेत. शांती, सीआयडी, क्योकी सास भी कभी बहु थी, जस्सी जैसी कोई नही, बादल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये सोज्वळ सुनेच्या भूमिकेत झळकणारी मंदिरा सध्या आपल्या ग्लॅमरस अवतारामुळं चर्चेत आहे. विशेष म्हणजे जसजसं तिचं वय वाढतंय ती आणखी सुंदर होत चालली आहे. अन् या सुंदरतेच श्रेय ती आपल्या फिटनेसला देते. 2010 साली तिनं अमेरिकेतील एका फिटनेस वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. या ठिकाणी आलेल्या स्त्रीयांचा फिटनेस पाहून मंदिरा अचाट झाली. अन् तिनं देखील फिटनेस फ्रिक होण्याचा निश्चय केला. (Simple Tips for Fitness)

अवश्य पाहा - ‘तुझ्यामुळं धर्म भ्रष्ट होतोय’; बिकिनी फोटोशूटमुळं मुस्लीम अभिनेत्री होतेय ट्रोल

अलिकडेच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मंदिरानं तिच्या बदललेल्या लाईफस्टाईल विषयी माहिती दिली होती. तिनं सर्वप्रथम आपल्या आहारात बदल केले. तेलकट, फास्टफूड, गोड पदार्थ खाणं थांबवलं. आहार तज्ज्ञांनी सांगितलेल्या वस्तूच ती योग्य प्रमाणात खाऊ लागली. शिवाय नियमित व्यायाम, योगा, कार्डियो आणि क्रॉसफिट या गोष्टी करु लागली. एक वेळ अशीही आली होती जेव्हा तिनं अभिनयाला रामराम ठोकून केवळ फिटनेसवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. इतर अभिनेत्री पस्तीशीनंतर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन आपलं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मंदिरानं फिटनेसचा पर्याय स्विकारला. अन् हेच तिच्या सौंदर्याचं रहस्य आहे. तुम्हाला देखील तिच्यासारखं सौंदर्य टिकवायचं असेल तर फिटनेसवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला ती आपल्या चाहत्यांना देते.

Published by: Mandar Gurav
First published: April 15, 2021, 9:11 AM IST

ताज्या बातम्या