मुंबई, 10 फेब्रुवारी : धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीला अखेर (Munawar Faruqui) सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून फारुकीला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. (munawar faruqui case in supreme court) विशेष म्हणजे तुरुंगातून बाहेर येताच त्याने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. “अंत: करणातील अंधार दूर करत मी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रकरण काय आहे? इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिंदू देवी-देवतांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं, असा आरोप फारुकीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याला 2 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. या अटकेविरोधात त्याने मध्यप्रदेश उच्च न्यायालयानं याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका न्यायालयानं फेटाळली. त्यानंतर त्यानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अन् त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. (stand-up comic’s release after SC order)
सर्वोच्च न्यायालयाने फारुकीला जामीन देण्याबरोबरच त्याच्या याचिकेवर मध्यप्रदेश पोलिसांना नोटीस देखील पाठवली आहे.
हे वाचा - न्यायाधीशांच्या फोननंतर फारुकीची तुरुंगातून सुटका
झी न्यूज नं दिलेल्या वृत्तानुसार, फारुकीच्या वकिलाने रीट पिटीशनबरोबरच अपीलसाठी स्पेशल लीव पिटीशन देखील दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती आरएफ नरीमन आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या पीठाने सुनावणी केली. न्यायालयाने फारुकीला अतिरिक्त दिलासा देत यूपी पोलीसांनी काढलेल्या वॉरंटवर देखील स्थगिती आणली.