मुंबई,4 जानेवारी- गेली दोन वर्षे जगभरात कोरोना महामारीने (Corona Pandemic) थैमान घातलं आहे. या दोन वर्षात लोकांनी अनेक संकटांना तोंड दिलं आहे. तर अनेक कलाकार देवासारखे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. या यादीत अभिनेता सोनू सूदचं (Sonu Sood) नाव सर्वात वर आहे. त्याने केलेली मदत विसरणं कोणालाही शक्य नाही. त्याचा हा उदारपणा पाहून अनेकांनी त्याला देव मानलं आहे. दरम्यान देशात पुन्हा एकदा कोरोनाने आपला विळखा घट्ट करायला सुरुवात केली आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त केली जात आहे. अशातच सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढं आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमधील २००० प्रवाशांदरम्यान तब्बल ६६ प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत (Corona blast in Mumbai Goa cruise ship). माहितीनुसार, या क्रूझमधील कोणत्याही प्रवाशाला गोव्यात उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्या ६६ कोरोना बाधित प्रवाशांसह इतर प्रवाशांना मुंबईला पाठवणार येण्याची तयारी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्या प्रवशांसाठी सोनू सूद पुन्हा एकदा देवासारखा धावून आला आहे.
I feel for the safety of 1950 passengers they should be allowed to get off at Goa port, it's totally unfair to make them travel back to Mumbai with COVID positive people. We should own our people. Request @goacm @tourismgoi to please help these families. Iam trying my way too. https://t.co/ewYNUGr7hJ
— sonu sood (@SonuSood) January 3, 2022
एक क्रूझ मुंबई ते गोवा असा प्रवास करत होता. यामध्ये तब्बल २००० प्रवासी होते. या क्रुझवरील एका क्रू मेम्बरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे इतर सर्व २००० प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांनतर यामध्ये तब्बल ६६ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं होतं. असं सांगण्यात येत आहे, की रविवारी पीपीई किटसोबत एक मेडिकल टीम या क्रूझवर पाठ्वण्यात आली होती. या टीमने उपस्थित प्रवासी आणि क्रूझ मेम्बरची आरटी आणि पीसीआर टेस्ट केली होती. त्यांनतर त्यांचा सोमवारी रिपोर्ट आला होता. यांनतर एका प्रवाशाने ट्विट करत सोनू सूदकडे मदतीसाठी कौल लावला होता. या प्रवाशाने ट्विट करत लिहिलं होतं, ‘सोनू सूद मदत करा.मुंबईतून गोवा जाणाऱ्या १९५० कोरोना निगेटिव्हप्रवाशांना गोव्यात उतरवण्याची परवानगी द्या’. गोवा अधिकाऱ्यांचं मत आहे, की ६६ कोरोना बाधित प्रवाशांसोबत कोरोनाची लागण न झालेल्या १९५० लोकांनी पुढे प्रवास करावा. आणि हे धोकादायक आहे. आम्ही याचा कडाडून विरोध करतो’. (हे वाचा: बॉलिवू़डमध्ये कोरोनाचा कहर! आज तीन नावांची पडली भर, एकतालाही लागण ) यावर उत्तर देत अभिनेता सोनू सूदने एक ट्विट केलं आहे. यामध्ये सोनू सूदने म्हटलं आहे, ‘मला त्या १९५० लोकांची काळजी वाटत आहे. त्यांना कोरोना बाधित इतर ६६ लोकांसोबत प्रवास करायला भाग पाडणं हे चुकीचं आहे. त्यांना गोव्यात उतरण्याची परवानगी देण्यात यावी’. आपल्यला आपल्या लोकांची जबाबदारी घेतली पाहिजे. मी गोवा सरकारला विनंती करतो या लोकांची त्यांनी मदत करावी. मी माझ्यामार्फत शक्य ते प्रयत्न करत आहे’. हा क्रूझ सध्या मोरमुगाओ फोर्ट टर्मिनलजवळच आहे.