मुंबई 19 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. देशभरातील हजारो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय देखील स्विकारला. मात्र रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अन् याचा थेट परिणाम लसींवर जाणवत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळं उपचारासाठी लसींचा तुटवडा निर्माण आहे. दरम्यान या तुटवड्यावर बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती (suchitra krishnamoorthi) हिनं नाराजी व्यक्त केली आहे. तिनं कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे परंतु तिला अद्याप लस मिळालेली नाही. त्यामुळं तिनं सोशल मीडियाद्वारे आपली तक्रार सरकारडे केली आहे.
सुचित्रानं ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. लस घेण्यासाठी ती मुंबईच्या लाइफलाईन हॉस्पिटलमध्ये गेली होती, परंतु तेथे तिला ही लस मिळू शकली नाही. तिला एका आठवड्यानंतर येण्यास सांगितलं आहे. त्यामुळं तिनं आपल्या चाहत्यांना सांगितले की, “कोरोना लसीची कमतरता ही केवळ अफवा नाही. तिला स्वतःला देखील या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.” तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा - ‘किती स्वार्थी आहेस तू?’; पैसे मागणारी सर्वात श्रीमंत अभिनेत्री होतेय ट्रोल
#Lifeline in goregaon and #arogyanidhi in JUHU. Mumbai #VaccineShortage . Centres closed
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) April 19, 2021
‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा
So I am bng turned back from #Lifeline hospital where i had a scheduled appointment for #COVID19Vaccine made in #cowin website0 . They have RUN OUT of vaccine - vaccine aa hi nahi raha hai. Ek week mein enquiry karo.
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) April 19, 2021
कोरोनानं घेतले 1 लाख 75 हजार 649 बळी
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 1 लाख 75 हजार 649 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Corona, Corona hotspot, Corona vaccine