• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Pornography Case: राज कुंद्राच्या संकटात वाढ; पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी

Pornography Case: राज कुंद्राच्या संकटात वाढ; पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी

क्राईम ब्रांचने दोन दिवसांपूर्वी राजच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या ऑफिसवर छापा मारला होता.

  • Share this:
    मुंबई 25 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography Case) सतत राजविरोधात विविध प्रकारचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान क्राईम ब्रांचने (Mumbai crime branch) त्याच्या ऑफिसवर छापा मारला होता. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती देणाऱ्या फाईल्स लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजच्या संकटात आणखी वाढ झाली आहे. Video: शिल्पा शेट्टीला चाहत्यांचं समर्थन; घरी फुलं पाठवून दिला धीर क्राईम ब्रांचने दोन दिवसांपूर्वी राजच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या ऑफिसवर छापा मारला होता. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती एक गुप्त तिजोरी लागली. या तिजोरीमध्ये अनेक महत्वाच्या फाईल ठेवल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फाईलमध्ये राजने ब्रिटीश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे. सध्या या प्रकरणात ED ने देखील उडी घेतली आहे. त्यामुळे आता राज कुंद्रा विरोधात पोलिसांच्या हाती अनेक सबळ पुरावे लागले आहेत. गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने...’ राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.
    Published by:Mandar Gurav
    First published: