मुंबई, 1 जून- उद्योगपती आणि रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका मेहता-अंबानी यांनी बुधवारी आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत केलं आहे. श्लोका अंबानीने गोंडस अशा लेकीला जन्म दिला आहे. श्लोका आणि आकाश दुसऱ्यांदा आईबाबा बनले आहेत. सध्या अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या लोकप्रिय जोडप्याला एक मुलगादेखील आहे. डिसेंबर 2020 मध्ये श्लोका अंबानीने पृथ्वीला जन्म दिला होता.चिमुकल्या पावलांनी घरी लक्ष्मी आल्याने सध्या अंबानी कुटुंब प्रचंड आनंदी आहे. काही दिवसांपूर्वीच श्लोकाने सासरे मुकेश अंबानी आणि पती आकाश अंबानी यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा साधेपणा सर्वानांच भावला होता. मध्यंतरी श्लोकाने बेबी बम्पसोबत सुंदर असं फोटोशूटसुद्धा केलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी श्लोकाचा प्रेग्नन्सी ग्लोसुद्धा दिसला होता. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उदघाटना प्रसंगीसुद्धा श्लोका आणि आकाशने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यावेळी श्लोका गुड न्यूज देणार असल्याचं समोर आलं होतं. श्लोका आणि आकाश आपल्या दुसऱ्या अपत्यासाठी फारच उत्सुक होते. Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी-राधिका मर्चंट पोहोचले केरळच्या प्रसिद्ध गुरूवायूर मंदिरात,समोर आले Unseen Photo आकाश अंबानी-श्लोका मेहता लग्न- आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांनी 2019 मध्ये लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे श्लोका आणि आकाश बालपणीचे मित्र आहेत. त्यामुळे या दोघांचं बॉन्डिंग फारच छान आहे. विविध कार्यक्रमांमध्ये श्लोका आणि आकाश सहभागी झालेले या दोघांची जोडी लोकांना प्रचंड पसंत पडते. दोघांचा साधेपणा सर्वांची मने जिंकतो. श्लोकाबाबत सांगायचं तर, श्लोका ही प्रसिद्ध हिऱ्याचे व्यापारी रसेल मेहता यांची मोठी लेक आहे. चिमुकल्या पावलांच्या आगमनाने सध्या अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
ईशा अंबानीने दिलेला जुळ्या मुलांना जन्म- काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबाची लेक ईशा अंबानीने जुडवा मुलांना जन्म दिला होता. त्यांनंतर आता श्लोकाने लेकीला जन्म दिला आहे. सोबतच काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडादेखील पार पडला होता. एकापाठोपाठ एक आलेल्या या गुड न्यूजने अंबानी कुटुंब भारावून गेलं आहे.