जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बर्थ डे दिवशी Hrithik Roshan ने रिलीज केला विक्रम वेधाचा Fist Look

बर्थ डे दिवशी Hrithik Roshan ने रिलीज केला विक्रम वेधाचा Fist Look

Vikram Vedha Fist Look

Vikram Vedha Fist Look

बॉलीवूडमध्ये हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्याच वाढदिवसाचे औचित्य साधत हृतिकने चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी: बॉलीवूडमध्ये हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्याच वाढदिवसाचे औचित्य साधत हृतिकने चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. त्याने आगामी विक्रम वेधा (Vikram Vedha Fist Look) या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. त्याचा हा लुक चांगलाच चर्चेत आला आहे. भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित, फ्रायडे फिल्मवर्क्स आणि एस. शशिकांतच्या YNOT स्टुडिओने फर्स्ट लुक रिलीज करत हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटातील हृतिकचा फर्स्ट लूक रिलीज करत निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत सैफ अली खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर राधिका आपटेनेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावली आहे. हृतिक रोशनने आपल्या इंस्टाग्रामवर आगामी विक्रम वेधा या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन ‘वेधा’च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हृतिकचा फर्स्ट लुक जबरदस्त दिसत आहे. या फोटोमध्ये काळा कुर्ता आणि गळ्यात काळा दोरा, विखुरलेले केस, चेहऱ्यावर-छातीवर रक्ताचे डाग, दाढी-मिशी, ब्लॅक कलरच्या गॉगलमध्ये तो रावडी दिसत आहे. त्याचा हा लूक त्याच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवत आहे.

जाहिरात

विक्रम वेधच्या मूळ व्हर्जनमध्ये साऊथ सिनेमाचा सुपरस्टार विजय सेतुपती वेधाच्या भूमिकेत दिसला होता. हृतिक रोशनच्या लूकमधील विजय सेतुपतीचा लूकही उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विक्रम वेधा हा निओ-नॉयर अॅक्शन क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. जी भारतीय मेटा-लोककथा विक्रम आणि बेतालवर आधारित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात