मुंबई, 20 एप्रिल- मृणाल कुलकर्णी या मराठी इंडस्ट्रीतील अतिशय गाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना थक्क केलं आहे. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. मृणाल कुलकर्णी नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचा मुलगा विराजस आणि सून शिवानीसुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. नुकतंच या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्याला आलेला एक विचित्र अनुभव शेअर केला आहे. मृणाल कुलकर्णी यांनी सर्वसामान्य भूमिकेपासून ऐतिहासिक भूमिकेपर्यंत प्रत्येक भूमिका पडद्यावर तितक्याच ताकतीने साकारली आहे. त्यांची प्रत्येक भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडते. मृणाल कुलकर्णी आजही पडद्यावर आणि सोशल मीडियावर तितक्याच सक्रिय आहेत.
त्या सतत मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये दिसत असतात. तसेच सोशल मीडियावरसुद्धा त्या सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत पोस्ट शेअर करत अपडेट्स देत असतात. (हे वाचा: Mamta Kulkarni B’day: टॉपलेस फोटोशूट, अंडरवर्ल्ड डॉनसोबत अफेयर, ड्रग्स माफियासोबत लग्न, आज साध्वी बनून असं आयुष्य जगतेय सलमानची अभिनेत्री ) दरम्यान नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी एका पुरस्कार सोहळयाला हजेरी लावली होती. या दरम्यान त्यांनी लोकमतला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अशा एका गोष्टीचा खुलासा केला की सर्वच थक्क झाले आहेत. यावेळी मृणाल कुलकर्णींनी बोलताना आपल्या एका विचित्र अनुभवाचा खुलासा करत आपण चक्क तळलेले किडे खाल्ल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. मृणाल कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, काही वर्षांपूर्वी त्या आपल्या पती आणि मुलगा विराजस कुलकर्णीसोबत चीनला गेल्या होत्या. तिथे त्यांना एक अतिशय रंजक नावाचा पदार्थ दिसला. त्यांनी तो खाल्लासुद्धा. तो पदार्थ होता तळलेल्या किड्यांचा. मृणाल यांनी सांगितलं त्या पदार्थाची चव छान होती. परंतु त्याबाबत समजल्यांनंतर तो पदार्थ खाणं अशक्य होतं. असं म्हणत त्यांनी आपल्याला आलेला विचित्र अनुभव शेअर केला आहे.
मृणाल कुलकर्णी यांच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. विराजस ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचला होता. तर त्यांची सूनसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीने गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली आहे. या सासू सुनेमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे.