बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी 90 च्या दशकातील अतिशय सुंदर आणि आघाडीच्या नायिकांपैकी एक होती. आज ममता आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे.
ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये नवी लेडी सुपरस्टार बनेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र अभिनेत्रीच्या नशिबात वेगळंच काही लिहलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याकाळात अंडरवर्ल्ड डॉनसोबत नातं असल्यामुळे ममताला सिनेमांत घेण्यासाठी दिग्दर्शकांना धमकावलं जात होतं.
इतक्या वाद विवादांनंतर ममता कुलकर्णीने ड्रग्स माफिया असणाऱ्या विक्की गोस्वामीसोबत लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता. अभिनेत्रीला एकदा ड्रग्स तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली होती. मात्र नंतर तिला सोडून देण्यात आलं होतं.