मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नानंतर Mouni Roy चा पतीसोबत Romance, शेअर केला Lip Lock चा Video

लग्नानंतर Mouni Roy चा पतीसोबत Romance, शेअर केला Lip Lock चा Video

Mouni Roy

Mouni Roy

नागिन फेम मौनी रॉय (Mouni Roy) आता मिसेस सूरज नांबियार झाली आहे. मौनी रॉयच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते. दरम्यान दोघांचा रोमँटिक अंदाजातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: नागिन फेम मौनी रॉय (Mouni Roy) आता मिसेस सूरज नांबियार झाली आहे. मौनी रॉयच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते. दरम्यान दोघांचा रोमँटिक अंदाजातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. दोघांच्याही या व्हायरल झालेल्या व्हिडीओकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मौनी आणि सूरज यांच्या एका पार्टीचा आहे. मौनीने आपल्या लग्नदरम्यान, पुल पार्टी सेलिब्रेट केली होती. तिने स्वतः हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मंदिरा बेदी यांनीदेखील त्यांच्या या पुल पार्टीला उपस्थिची लावली होती.

या व्हिडीओमध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियार सोबत रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. दोघांनीही सर्वांसमोर लिपलॉक किस केले असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी देखील धमाल डान्स करत पार्टीचा आनंद लुटला.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

दरम्यान मौनी रॉयनं तिच्या इन्स्टाग्रामवर लग्न आणि त्याआधीच्या वेगवेगळ्या फंक्शनचे बरेच फोटो शेअर केले आहेत. मौनीनं हा व्हिडीओ देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, ‘माय बंच ऑफ फूल्स’ असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

मौनी रॉय आणि सूरज नांबियारने 27 जानेवारीला गोव्यात लग्न झालं. सकाळी दोघांनी मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले. यानंतर रात्री या कपलने बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं.. बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी मौनीच्या लग्नाबद्दल अभिनंदन केले.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Marriage, Relationship, Romance, Romantic day, Wedding, Wedding couple