मुंबई, 22 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. त्यांच्या या व्हिडीओला युजर्सची पसंती मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड एका लहान मुलावर प्रेम करताना दिसत आहे. त्या माकडाचं त्या मुलावर इतकं प्रेम आहे की तो त्याच्या आईलाही त्याला हात लावू देत नाही. या व्हिडीओमध्ये दिसतं की, त्या मुलाची आई माकडाच्या हातून खेचून घेते पण तरीही ते माकड त्या मुलाला अजूनच घट्ट पकडून ठेवतो. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अभिनेता अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, हे माकड आणि मुलगा यांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही आहे की ते भारताच्या कोणत्या गल्लीत आहेत. त्या मुलाची आई आहे याचा सुद्धा त्या माकडाला फरक पडत नाही. या दोघांमध्ये भोळेपणा दिसत आहे. अशाप्रकारेही जीवन जगता येऊ शकतं. इतकंच नाही तर हा व्हिडीओ ज्यांनी शूट केला आहे त्यालाही योग्य अँगल मधून तो व्हिडीओ शूट करावा असं काही बंधन वाटत नाही. ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं..
Both monkey & the child don’t care that they are on a busy street somewhere in India. Mother of the child is not hysterical. There is a certain innocence and that ‘Life goes on’ feel about it. Even the person shooting this video is not looking for a perfect angle. Enjoy.😍🤓 pic.twitter.com/iIXhQvrfOE
— Anupam Kher (@AnupamPKher) December 21, 2019
अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासोबतच ते सामाजिक मुद्द्यांवरही बोलताना दिसतात. काही वेळा तर त्यांची ट्वीट खूप व्हायरलही होतात. अनुपम यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ते काही दिवसांपूर्वी ‘वन डे’ या सिनेमात दिसले होते. या सिनेमात अभिनेत्री ईशा गुप्ता सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत होती. याआधी त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ बायोपिकमध्ये काम केलं होतं. ‘शोषणासाठी पॉवरफुल पदाचा वापर केला जात असेल तर…’ सनी लिओनीनं दिला मोलाचा सल्ला अभिनेत्री मौनी रॉयच्या सुंदर चेहऱ्याचं ‘हे’ आहे रहस्य!