मुंबई, 4 ऑगस्ट : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल मध्ये गणना होते. हे दोघे सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे क्युट फोटोज आणि व्हिडीओज चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चाहत्यांना हि क्युट जोडी खूपच आवडते. या दोघांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसतात. सिद्धार्थ चांदेकर गेले काही दिवस लंडनमध्ये शूटिंग करत होता. तर मिताली मयेकर भारतातच शूटिंगमध्ये बिझी होती. हे दोघे जण एकमेकांना खूप मिस करताना दिसत होते. मध्यंतरी सिद्धार्थने मितालीचा लंडनमधील फोटो टाकत ‘मी या व्यक्तीला खूप मिस करतोय,’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यावर मितालीने ‘तू लवकर परत ये’ अशी भावनिक कमेंट देखील केली होती. अखेर सिद्ध्यर्थ आता लंडनवरून परत आलाय. तेव्हा मितालीने केलेल्या कृतीची आता चर्चा होतेय. सिद्धार्थ चांदेकर लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘congratulations’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाची शूटिंग थेट लंडनमध्ये सुरु होती. या चित्रपटामध्ये सिद्धार्थसोबत पूजा सावंत, अजिंक्य देव, अलका कुबल हे कलाकार देखील आहेत. जवळजवळ गेला महिनाभर झाले हे तिकडे शूटिंग करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच चित्रपटाचं लंडनमधील शूटिंग संपल्याची माहिती लोकेश गुप्ते यांनी दिली होती. हेही वाचा - Prasad Oak: लंडनवरून येताना ‘हे’ घेऊन या; चाहत्याने प्रसादकडे केली अजब मागणी आता हे कलाकार लंडनमधून आपल्या घरी परतत आहेत. सिद्धार्थ चांदेकरसुद्धा काल लंडनमधून परतला आहे. त्याची बायको आणि अभिनेत्री मिताली मयेकर त्याची आतुरतेने वाट बघत होती. काल सिद्धार्थला भेटण्यासाठी तिने थेट एअरपोर्ट गाठलं होतं. सिद्धार्थला एअरपोर्टवर बघताच मितालीने कुठलाही विचार न करता पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. त्याला भेटण्यासाठी ती किती आतुर झाली होती हे समजत आहे. मितालीने तिच्या इंस्टाग्रामवर हा क्युट फोटो शेअर केला आहे. ‘होमकमिंग’ असं म्हणत तिने सिद्धार्थ सोबतच फोटो शेअर केलाय. त्या दोघांना पुन्हा एकत्र आलेलं पाहून त्यांचे चाहते सध्या खुश आहेत.
सिद्धार्थ आणि मितालीची ही जोडी कायम चर्चेत असते. ते दोघेजण फक्त एकमेकांचे नवराबायको नसून चांगले मित्र देखील आहेत. हे दोघेजण आपापल्या कामात व्यस्त असतानादेखील एकमेकांसाठी वेळ काढताना दिसतात. आता हे दोघे जण अनेक दिवसांनी पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांचे वेगवेगळे फोटो चाहत्यांना पाहायला मिळतील.