जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्टला साकारायचेत छत्रपती शिवाजी महाराज; मराठमोळ्या दिग्दर्शकासमोर केला खुलासा

Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्टला साकारायचेत छत्रपती शिवाजी महाराज; मराठमोळ्या दिग्दर्शकासमोर केला खुलासा

Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्टला साकारायचेत छत्रपती शिवाजी महाराज; मराठमोळ्या दिग्दर्शकासमोर केला खुलासा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नुकतीच भेट झाली. ज्यामध्ये नागराज यांच्याशी बोलताना आमिर खानने त्याची एक इच्छा बोलून दाखवल्याचं समजत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 20 जुलै: छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाचाच उर आनंद आणि अभिमानाने भरून येतो. केवळ महाराष्ट्र किंवा देशापुरतं त्यांचं नाव मर्यादित नाहीये तर त्यांच्या पराक्रमाची ख्याती ही सर्वदूर अगदी जगभरात पसरली असल्याचं दिसून येत असतं. शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल घेत मराठीमध्ये सुद्धा अनेक चित्रपट बनताना दिसत असतात. सध्या बॉलिवूडच्या (aamir khan) मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला सुद्धा शिवाजी महाराजांच्या पराक्रमी नेतृत्वाने प्रभावित केलं असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची इच्छा एका मराठमोळ्या दिग्दर्शकासमोर बोलून दाखवल्याचं समोर येत आहे. बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि मराठीतील एक सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळख असणारे नागराज मंजुळे यांच्यात नुकतीच एक भेट झाल्याचं समोर येत आहे. या झालेल्या भेटीमध्ये, दोघांनी एकमेकांशी अतिशय रोमांचक विषयांवर गप्पा मारल्या. या वेळी गप्पांमध्ये नागराज मंजुळे (nagraj manjule aamir khan) यांनी आमिर खानला रुपेरी पडद्यावर कोणती भूमिका साकारायची आहे याबद्दल विचारणा केली. ज्यावर आमिरने सांगितलं की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट करायचा आहे, कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाने तो खूप मोहित आणि प्रेरित आहे. तसंच या परफेक्शनिस्ट अभिनेत्याने प्रतिभावान नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा सुद्धा या भेटीत व्यक्त केली. सैराट, फॅन्ड्री, झुंड अशा अनेक चित्रपटांचा प्रतिभावान दिग्दर्शक नागराज आणि आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर, मिळून नक्कीच एक नेत्रदीपक टीम बनेल अशी अशा त्याने व्यक्त केल्याचं कळून येत आहे.

जाहिरात

दरम्यान, आमिर खानच्या वर्क फ्रंटवर तो सध्या बराच सक्रिय असल्याचं समोर येत आहे. आगामी काळात ‘लाल सिंग चढ्ढा’ या सिनेमात दिसून येणार आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवल्याचं समोर येत आहे. हे ही वाचा-  Kareena Kapoor Khan: तिसऱ्यांदा आई बनणार करीना कपूर? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा चाहते चित्रपटातील प्रत्येक भागाचे भरभरुन कौतुक करत आहेत. अलीकडेच, यातील एक गाणे ‘कहानी’चा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आणि सर्वच स्तरातील प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात