मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या सिनेमात तो एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारताच्या यशस्वी मंगळ मोहीमेची ही कथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा आपल्या मुलीसाठी करत असल्याचं अक्षयनं याआधीच कबूल केलं होतं. येणाऱ्या पीढीला हे सर्व समजावं यासाठी मी ही सिनेमा करत असल्याचं अक्षयनं सांगितलं होतं. या सिनेमात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असली तरीही एक-दोन नाही तर तब्बल 5 अभिनेत्री त्याच्यासोबत या सिनेमात दिसणार आहेत. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळचा अक्षयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निकच्या ‘या’ शर्टलेस फोटोंना ट्रोल करणाऱ्यांवर प्रियांका वैतागली अक्षय कुमारचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सर्वात आधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर तो व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार मेकअप रूमध्ये सोनाक्षीला मेकअप करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो मेकअप करतानाच सोनाक्षीला चिडवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सोनाक्षीनं त्याला कमी बजेटवाला मेकअपमन असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर या फनी व्हिडिओला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ मिशन मंगलच्या प्रमोशनच्या आधीचा असल्याचं दिसत आहे. हार्ड कौरची मोदी-शहांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ट्विटरनं केली ‘ही’ कारवाई
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मिशन मंगल’ या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. अंतराळ यान मंगळ ग्रहावर पाठवणं हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. प्रक्षेपणाचा फार काही अनुभव नसतानाही नासाच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि सर्व बाजूंनी फक्त नकार मिळत असतानाही हार न मानता मिशन मंगल यशस्वी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकांची मेहनत या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रभाससोबत रिलेशिपमध्ये आहे अनुष्का, शोधतेय नवं घरं? ट्रेलरच्या अगदी शेवटी अक्षय कुमारचं वाक्य ‘पुरी दुनिया से कहो कॉपी दॅट’ हे वाक्य अक्षरशः अंगावर काटा आणतं. अक्षय सोबत दिवसरात्र झटलेल्या त्या पाच जणींची ही कथा. हा सिनेमा उद्या स्वातंत्रदिनाच्या मुहूर्तावर रिलीज होत असून या सिनेमाबाबत प्रेक्षाकांच्यामनात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. ======================================================================= VIDEO: ‘माझ्या धन्या, मी दम सोडला पण…’ मनाला चटका लावणारी कविता!

)







