जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: '...तिचे पंख कापू नका'; हिजाब वादावर मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने मांडली स्पष्ट भूमिका

VIDEO: '...तिचे पंख कापू नका'; हिजाब वादावर मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने मांडली स्पष्ट भूमिका

VIDEO: '...तिचे पंख कापू नका'; हिजाब वादावर मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने मांडली स्पष्ट भूमिका

22 वर्षीय मिस युनिव्हर्स हरनाझ संधू 17 मार्च रोजी एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत (Mumbai) होती. यावेळी एका पत्रकाराने तिला हिजाबच्या वादावर प्रश्न विचारला आणि या विषयावर तिची प्रतिक्रिया विचारली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 28 मार्च : कर्नाटकमधील हिजाब प्रकरण (Hijab Controversy) गेले काही महिने चांगलंच चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी कर्नाटक हायकोर्टाने यावर निकाल देत हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग मानण्यास नकार दिला. त्यानंतर या निकालावर बराच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. काहींनी हा निकाल योग्य असल्याचं म्हटलं. तर, काहींनी कर्नाटक हायकोर्ट इस्लामच्या मान्यतांमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला. हायकोर्टाने निर्णय देऊन आता महिना होत आला आहे, परंतु या वादाबद्दल चर्चा मात्र अजूनही सुरू आहे. या संदर्भात डिबेट होत असून अनेक नेत्यांच्या आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया या निर्णयावर घेतल्या जात आहेत. अलीकडेच याबाबतीत यंदाची मिस युनिव्हर्स हरनाझ कौर संधूची (Harnaaz Kaur Sandhu) प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर हरनाझने मुलींनाच टार्गेट करणं थांबवा, असं आवाहन केलं. 22 वर्षीय मिस युनिव्हर्स हरनाझ संधू 17 मार्च रोजी एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत (Mumbai) होती. यावेळी एका पत्रकाराने तिला हिजाबच्या वादावर प्रश्न विचारला आणि या विषयावर तिची प्रतिक्रिया विचारली. हरनाझच्या टीमच्या वतीने रिपोर्टरला फक्त हरनाझचं करिअर, संघर्ष आणि यशाबद्दलच प्रश्न विचारण्यात यावेत, कोणतेही राजकीय प्रश्न विचारू नयेत, असं सांगितलं गेलं. परंतु तरीही रिपोर्टरने पुन्हा हरनाझला या विषयावर प्रतिक्रिया विचारली. जम्मू-काश्मीरमध्ये पहिला हिंदू मुख्यमंत्री बनण्यासाठी मोदी-शाहांचा मास्टर प्लॅन? काय भाजपची नवीन खेळी? हरनाझची प्रतिक्रिया यावर खुद्द हरनाझने रिपोर्टरला प्रश्न केला आणि म्हणाली, “तुम्ही नेहमी मुलींना का टार्गेट करता?, जसं तुम्ही अजूनही मला टार्गेट करत आहात. तिला (प्रत्येक मुलीला) जसं जगायचं आहे, तसं तिला जगू द्या, तिला गगनात भरारी घेऊ द्या, तिला आयुष्यात जे करायचंय ते करू द्या. तुम्ही तिचे पंख कापू नका. तुम्हाला पंख कापायचे असतील तर तुमचे कापा, तिची प्रगती थांबवू नका,” असं ती म्हणाली. दरम्यान, हिजाबच्या वादात हरनाझचा हा व्हिडिओ सोशल (social media) मीडियावर व्हायरल झाला आहे.

    जाहिरात

    हरनाझच्या वक्तव्यावर लोकांच्या प्रतिक्रिया एका युजरने लिहिलं, “मिस हरनाझ, मुलींना शाळेबाहेर हिजाब घालण्यापासून कोणीही रोखत नाही, पण शाळेत हिजाब कसा घालता येईल. तुम्हाला गणवेशाचा नियम माहीत नाही का?” तर दुसर्‍या युजरने लिहिले की, “युनिफॉर्म विसरा, पण कोर्टाचा निर्णय वाचा. हिजाबवर बंदी नाही, फक्त शाळेत घालण्यास मनाई आहे.” तर, “गणवेशावर निर्णय घेण्याचा अधिकार शाळेला आहे. शाळेचा हा नियम कोणाला आवडत नसेल तर शाळा बदला, वादविवाद करण्याची काय गरज आहे?,” असं एक नेटकरी म्हणाला. पंतप्रधान मोदी यांच्या Mann Ki Baat मध्ये नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचा गौरव! म्हणाले.. दरम्यान, हरनाझच्या या उत्तराने मुस्लीम समाजातील लोकांनी तिचं कौतुक केलंय. एका युजरने लिहिलं की, “हरनाझ नेहमी सत्याच्या बाजूने बोलते, आम्ही तिच्या धैर्याचे कौतुक करतो.” दुसरीकडे हरनाझच्या उत्तरावर सुधाकर चोप्रा म्हणाले, “खरं तर, रिपोर्टरला याप्रकरणी हरनाझकडून काहीतरी उत्तर अपेक्षित होतं. मात्र, हरनाझने बोलताना मुलींना टार्गेट करणं थांबवण्याचं आवाहन केलं. तिचं उत्तर ऐकून असं वाटलं की तिला या विषयाची कोणतीच माहिती नव्हती.” हरनाझच्या या उत्तराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात