Home /News /entertainment /

'एवढा खराब ड्रेस कोणी कसं काय घालू शकतं'; सी-थ्रू गाऊनमुळे मलायका अरोरा ट्रोल

'एवढा खराब ड्रेस कोणी कसं काय घालू शकतं'; सी-थ्रू गाऊनमुळे मलायका अरोरा ट्रोल

मलायकानं नुकतीच 'मिस इंडिया वर्ल्ड 2022' (Miss india world 2022) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मिस इंडिया वर्ल्ड 2022 स्पर्धेत मलायका अरोरा ज्युरी सदस्य होती. या कार्यक्रमासाठी मलायकानं एक खास लूक केला होता.

  मुंबई, 4 जुलै : बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malika arora)सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नेहमीच ती तिच्या हाॅट लूकमुळे (malika arora hot look) आणि हटके ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. मलायका आता पुन्हा एकदा तिच्या हाॅट लूकमुळे चर्चेत आली आहे. मलायकानं नुकतीच 'मिस इंडिया वर्ल्ड 2022' (Miss india world 2022) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मिस इंडिया वर्ल्ड 2022 स्पर्धेत मलायका अरोरा ज्युरी सदस्य होती. या कार्यक्रमासाठी मलायकानं एक खास लूक केला होता. तिच्या या लूकनं सगळ्यांच लक्ष वेधलं असून तिचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. 3 जुलैला रात्री झालेल्या 'मिस इंडिया वर्ल्ड 2022' कार्यक्रमात मलायकानं एका चमकदार सोनेरी गाऊन परिधान (malika arora wear golden gown)केला होता. या गाऊनवर मलायकानं गळ्यात हिरव्या कलरच्या स्टोनचा नेकलेस घातला होता. तिच्या या लूकनं अनेकांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. तर काहींनी तिला ट्रोलही केलं. हेही वाचा - Miss India World 2022 : जन्माने मुंबईकर आहे नवी मिस इंडिया सिनी शेट्टी, कोण होती इन्स्पिरेशन पाहा... मलायकानं मिस इंडिया 2022 कार्यक्रमासाठी गोल्डन कलरचा सी-थ्रू गाऊन घातला होता. या गाऊनमुळे देखील मलायकाला ट्रोल (malika arora troll)केलं जात आहे. अनेकांनी मलायकाची तुलना अमेरिकन रिअॅलिटी स्टार किम कार्दशियनशी केली. तिच्या हाॅट लूकमुळे आणि ड्रेसिंगमुळे तिला कार्दशियनशी सारखं घातल्याचं म्हटलं आहे. 'एवढं कोणी खराब ड्रेस कसा काय घालू शकतं', 'कार्दर्शियन सारखं बनत चालली आहे खूपच खराब', असं म्हणत ट्रेल करण्यात आलं. मलायका अरोरा 48 व्या वर्षीही एकदम फिट आणि हाॅट आहे. तिचे नवनवीन लूक नेहमीच चाहत्यांना पहायला मिळतात. सध्याचा चमकदार सोनेरी गाउनमधील लूकसुद्धा व्हायरल होत असून तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायकाच्या लूकवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
  मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा ग्रँड फिनाले 3 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सिनी शेट्टीने शानदार सामन्यानंतर मुकुट जिंकला. मिस इंडिया वर्ल्ड 2022 च्या ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सची ग्लॅमरस स्टाइल पाहायला मिळाली. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. यामध्ये मलायकाही सहभागी होती. मलायकाशिवाय  क्रिती सॅनॉन आणि नेहा धुपिया सारख्या बॉलिवूड दिवा त्यांच्या फॅशनेबल उत्कृष्ट वेशभूषेत रेड कार्पेटवर आल्या होत्या.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या