मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मातीशी नाळ जोडलेला अभिनेता, पंकज त्रिपाठींनी गावाच्या शाळेचा केला कायापालट

मातीशी नाळ जोडलेला अभिनेता, पंकज त्रिपाठींनी गावाच्या शाळेचा केला कायापालट

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

ज्या शाळेनं त्यांना घडवलं कलाकार होण्याचं स्वप्न ज्या शाळेत पाहिलं त्या शाळेच्या विकासासाठी आज पंकज त्रिपाठी प्रयत्न करत आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी एक छोट्याशा गावातून मायानगरीत येऊन आपली सुरुवात केली. त्यांना सिनेक्षेत्राची फार माहिची नव्हती. या कलाकारांपैकी एक पंकज त्रिपाठी आहे. मिर्झापूर वेबसीरिजनंतर पंकज त्रिपाठी यांना कालीन भैय्या एक वेगळी ओळख मिळाली. मिर्झापूर सीरिज ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी संधी आणि त्याच्या करियरला पुढे घेऊन जाण्यासाठी बेस्ट सीरिज ठरली होती.

आज पंकज त्रिपाठी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या उंचीवर त्याचं नाव पोहोचलं आहे. मात्र गावातून मायानगरीत येण्यापर्यंतचा आणि  आपलं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा संघर्ष फार खडतर आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी पंकज त्रिपाठी आपल्या गावाला विसरले नाही.

Main Atal Hoon : पंतप्रधान, कवी राजकारणी, मैं अटल हूं मधील पंकज त्रिपाठीचा पहिला लुक समोर, ओळखणंही झालं कठीण

ज्या शाळेनं त्यांना घडवलं कलाकार होण्याचं स्वप्न ज्या शाळेत पाहिलं त्या शाळेच्या विकासासाठी आज पंकज त्रिपाठी प्रयत्न करत आहेत. पंकज त्रिपाठी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९७६ रोजी झाला. ते बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी आहे. पंकज यांचं प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. या शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक पंकज यांच्याशी बोलले असता त्यांनी या चांगल्या कामासाठी लगेच होकार दिला.

पंकज त्रिपाठी यांच्या मते, 'मुलांच्या विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्याशी बोलून सांगितले की, शाळेची बाउंड्री वॉल आणि गेट बांधण्यासाठी पैशांची गरज आहे कारण बाहेर रस्ता आहे आणि मुले खेळताना त्या बाजूला जातात, त्यामुळे मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे काम करायला हवं.

मी त्यांना माझ्या परीने मदत करण्याचं आश्वासन दिलं. मी स्वतः त्या शाळेत शिकलो होतो, त्यामुळे माझाही या शाळेशी संबंध होता.'' पंकज यांनी आपल्या भावाच्या मदतीने एक प्रकल्प तयार केला आणि पैशाची व्यवस्था करून शाळेचे नूतनीकरण केले.

एकेकाळी केक घेण्यासाठीही नव्हते पैसे, आज करोडोंचे मालक आहेत Pankaj Tripathi, इतकी आहे संपत्ती

पंकज सांगतात की जेव्हा त्यांनी गावातील शाळेला भेट दिली तेव्हा तिची अवस्था अतिशय वाईट होती. प्लॅस्टर निघालं होतं, रंग उडाला होता, पंखे नीट काम करत नव्हते, लाईटही चालत नव्हत्या. अशा परिस्थितीत शाळा आणि मुलांच्या विकासासाठी या दिशेने काम करणे गरजेचे आहे, असे पंकज यांना वाटले. मिर्झापूरच्या कालीन भैय्या म्हणजेच पंकज यांनी शाळेचा विकास केल्यानं गावात सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगली आहे.

First published:
top videos

    Tags: Bihar, Bollywood, Bollywood actor, Pankaj tripathi