मुंबई, 5 सप्टेंबर: आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे पंकज त्रिपाठी. भोजपुरी फिल्म इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास करणारे पंकज त्रिपाठी आज 5 सप्टेंबर रोजी त्यांचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या खास दिवशी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. पंकज त्रिपाठीचे नाव बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणले जाते. चित्रपटांतील त्यांची भूमिका नेहमीच वाखाणण्याजोगी असते. मात्र एक काळ असा होता की त्यांना कोणी ओळखत नव्हते आणि मायानगरीत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. पंकज यांनी नाटकामधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केली आहे. पंकज त्रिपाठी महाविद्यालयीन काळात राजकारणात खूप सक्रिय होते. त्यांनी हिंदीमध्ये पदवी संपादन केली आणि भाजपची विद्यार्थी शाखा ABVP चा भाग झाले. 2004 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईला आले. त्यानंतरही त्यांनी खूप संघर्ष करुन बॉलिवूडमध्ये आघाडीचं स्थान मिळवलं.
एकेकाळी पत्नीच्या केकसाठीही पैसे नसलेल्या पंकज यांच्याकडे आज कोटींची संपत्ती आहे. पंकज त्रिपाठी हे बिहारमधील बेलसंड येथे अतिशय आलिशान घरात राहतात. त्यांची एकूण संपत्ती 40 कोटींच्या आसपास आहे. पंकजचाही मुंबईतही घर आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ ई200, टोयोटा फॉर्च्युनर, मर्सिडीज एमएल 500 अशा बऱ्याच गाड्या आहेत. हेही वाचा - Teachers Day 2022: ‘सुपर 30 ते ‘3 इडियट्स’ पर्यंत, शिक्षक दिनी हे 5 चित्रपट नक्की पाहा दरम्यान, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रावण’, ‘मसान’, ‘द ताश्कंद फाइल्स’ ‘दबंग 2’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘फुक्रे’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’मध्ये दिसला आहे. , ‘लुडो’.’, ‘मिमी’, ‘गुंजन सक्सेना’, ‘शेरडील: द पिलीभीत सागा’, आणि ‘बच्चन पांडे’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ‘पावडर’, ‘मिर्झापूर’, ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. पंकज त्रिपाठीने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.