जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / एका मिनिटांत किती डीप्स मारु शकाल?, मिलिंद सोमणनं दिलं चाहत्यांना चॅलेन्ज

एका मिनिटांत किती डीप्स मारु शकाल?, मिलिंद सोमणनं दिलं चाहत्यांना चॅलेन्ज

एका मिनिटांत किती डीप्स मारु शकाल?, मिलिंद सोमणनं दिलं चाहत्यांना चॅलेन्ज

वयाच्या 55 व्या वर्षी मिलिंद सोमण एका मिनिटांत मारतो इतके डीप्स; तुम्ही करु शकाल का त्याची बरोबरी? अभिनेत्यानं चाहत्यांना दिलं आव्हान

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 14 मे: अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हा वयाच्या 55 व्या वर्षी देखील फिट अँड फाईन आहे. एकाद्या 25 वर्षांच्या तरुणाला त्याच्याकडे पाहून लाज वाटेल असं दमदार शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. अन् त्याच्या या सुदृढ शरीराचं संपूर्ण श्रेय जातं त्याच्या नियमित व्यायामाला. अलिकडेच त्याला कोरोनाची लागण झाली होती. परंतु काही दिवसांतच त्यानं कोरोनावर मात केली अन् आता पुन्हा एकदा तो नियमित व्यायाम करु लागला आहे. नुकताच त्यानं एक पुशअप्स मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (six finger pull ups) लक्षवेधी बाब म्हणजे तो एका मिनिटांत तब्बल 40 पुशअप्स मारतो. (viral video) मिलिंदची ही फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो पुशअप्स कसे मारायचे? आणि कसे मारायचे नाहीत? याबद्दल मार्गदर्शन करत आहे. शिवाय व्हिडीओच्या शेवटी त्यानं एक मिनिटांत 40 पुशअप्स मारुन दाखवले. खरं तर पुशअप्स हा अत्यंत कठीण प्रकार आहे. यामध्ये केवळ हाताच्या आधारावर संपूर्ण शरीराचं वजन उचलावं लागतं. हा व्यायाम करताना शरीराचं संतुलन असणं गरजेचं आहे. अन्यथा हात किंवा पाठ लचकू शकते. परंतु मिलिंद दररोज न चूकता हा व्यायाम करतो त्यामुळं आता तो अगदी पटाईत झाला आहे. अन् तुम्हाला देखील अशी फिटनेस हवी असेल तर दररोज व्यायाम करा असा सल्ला त्यानं या व्हिडीओद्वारे चाहत्यांना दिला आहे. ‘तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतो’, करीना कपूरला धमकी

जाहिरात

अक्षय कुमारचा भारतीय सैन्यासोबत भांगडा; शाळेला तब्बल 1 कोटींची मदत या व्यतिरीक्त त्यानं आणखी एक पोस्ट शेअर करत आपल्या फॅन्सना जागरूक केलंय आणि याची बरीच चर्चाही झाली होती. “काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचं करोनामुळे निधन झालं. त्याचं वय ४० इतकं होतं… त्याचं जाणं हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं…खूप लोकांनी मला विचारलं की, तु स्वतःला इतकं फिट ठेवतोस. मग तुला कसा करोना झाला…? पण माझं असं मत आहे की, जर तुमचं फिटनेस आणि आरोग्य उत्तम असलं तर करोनाशी सामना करण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होते…पण ते तुम्हाला लागण होण्यापासून थांबवू शकत नाही.”, असं या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात