बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमार सध्या काश्मीरमध्ये पोहोचला आहे.
2/ 10
त्यानं काश्मिरमध्ये जाऊन भारतीय सैन्य दलाच्या सैनिकांशी भेट घेतली.
3/ 10
या भेटीदरम्यान अक्षयनं काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील नीरू गावात शाळा बांधण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.
4/ 10
सर्वप्रथम त्यानं गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळील नीरू गावाला भेट दिली.
5/ 10
गावाला भेट दिल्यानंतर त्यानं तेथील शाळेचं निरिक्षण केलं. ही शाळा अत्यंत वाईट स्थितीत होती.
6/ 10
त्यामुळं शिकणाऱ्या मुलांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळं शाळेची पुर्नबांधणी करण्यासाठी त्यानं एक कोटी रुपयांची देणगी दिली.
7/ 10
सोबतच भविष्यात इतरही वस्तुंसाठी शाळेला आर्थिक मदत करण्याचं वचन त्यानं दिलं आहे.
8/ 10
शाळेनंतर त्यानं भारतीय सैन्य दलाच्या इतर सैनिकांची भेट घेतली.
9/ 10
जवळच बीएसएफचे युनिटची पोस्ट आहे, तिथे अक्षयने भारतीय सैनिक आणि स्थानिक लोकांसह जोरदार भांगडाही केला.
10/ 10
ही क्षणचित्र BSF च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. दरम्यान या मदतीसाठी अक्षयच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.