मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video: मिलिंद सोमणचा अजब प्रताप; भर रस्त्यात बसून करतोय अंघोळ

Video: मिलिंद सोमणचा अजब प्रताप; भर रस्त्यात बसून करतोय अंघोळ

मिलिंदने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भर पावसात रस्त्यावर बसून अंघोळी करत आहे.

मिलिंदने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भर पावसात रस्त्यावर बसून अंघोळी करत आहे.

मिलिंदने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भर पावसात रस्त्यावर बसून अंघोळी करत आहे.

मुंबई 6 ऑगस्ट: अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हा वयाच्या 55 व्या वर्षी देखील फिट अँड फाईन आहे. एखाद्या 25 वर्षांच्या तरुणाला त्याच्याकडे पाहून लाज वाटेल अशी दमदार शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. तो आपल्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर देखील अनेकदा चर्चेत असतो. (Milind Soman Video Viral) मात्र यावेळी तो एका वेगळ्याच व्हिडीओमुळे चर्चेत आहे. तो चक्क भर रस्त्यात अंघोळी करत आहे. त्याचा हा लक्षवेधी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिलिंदने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भर पावसात रस्त्यावर बसून अंघोळी करत आहे. “हे शूटिंग मजेशीर आहे. पुशअप्स आणि पळण्याशिवाय मी आणखी काय करू शकतो हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे. माझा एक नवा मुव्ही येतोय.” अशा आशयाची लक्षवेधी कमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे.

सोनाली-कुणालचं कपल गोल; मालदीवच्या फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

Super Dancer मधून शिल्पा शेट्टीचा पत्ता गुल; सोनाली बेंद्रे घेणार जागा?

यापूर्वी मिलिंद पुशअप्स चॅलेंजमुळे चर्चेत होता. मिलिंदची ही फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो पुशअप्स कसे मारायचे? आणि कसे मारायचे नाहीत? याबद्दल मार्गदर्शन केलं होतं. शिवाय व्हिडीओच्या शेवटी त्यानं एक मिनिटांत 40 पुशअप्स मारुन दाखवले. खरं तर पुशअप्स हा अत्यंत कठीण प्रकार आहे. यामध्ये केवळ हाताच्या आधारावर संपूर्ण शरीराचं वजन उचलावं लागतं. हा व्यायाम करताना शरीराचं संतुलन असणं गरजेचं आहे. अन्यथा हात किंवा पाठ लचकू शकते. परंतु मिलिंद दररोज न चूकता हा व्यायाम करतो त्यामुळं आता तो अगदी पटाईत झाला आहे. अन् तुम्हाला देखील अशी फिटनेस हवी असेल तर दररोज व्यायाम करा असा सल्ला त्यानं या व्हिडीओद्वारे चाहत्यांना दिला.

First published:
top videos

    Tags: Milind soman, Shocking viral video