मिलिंद सोमण हा एक भारतीय सुपरमॉडेल, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि फिटनेस प्रमोटर आहे. 55 व्या वर्षातही तो हिट आणि हॉट दिसतो म्हणून तरुणी फिदा असतात.
अंकिता कुंवरही कॅबिन क्रू मेंबर त्याच्या प्रेमात पडली. आपल्याहून 26 वर्षांनी लहान अंकिताशी मिलिंदने लग्नही केलं.
या वयात मिलिंदने लग्न केलं आणि तेही निम्म्या वयाच्या मुलीशी, तेव्हा या लग्नाची खूपच चर्चा झाली आणि किती दिवस रिलेशनशिप टिकणार असंही बोललं गेलं.
अंकिता आणि मिलिंद सोशल मीडियावरून त्यांच्या पर्सनल लाइफचेही फोटो अपडेट करत असतात. वय बघून नव्हे, व्यक्ती पाहून लग्न करा, असं मिलिंद आता सांगतो.
मिलिंदच्या आधी सुद्धा अंकिता रिलेशनशिप मध्ये होती. पण तिच्या बॉयफ्रेंडचा आकस्मिक मृत्यू झाला होता.
अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, Memes बनवले, जोक्स तयार केले. पण दोघांनी कधीही त्याचं वाईट वाटून घेतलं नाही.