जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / भर पार्टीत मिका सिंगने राखी सावंतला जबरदस्ती केलेलं KISS; 17 वर्षानंतर गायकाची कोर्टात धाव

भर पार्टीत मिका सिंगने राखी सावंतला जबरदस्ती केलेलं KISS; 17 वर्षानंतर गायकाची कोर्टात धाव

मिका सिंगने राखी सावंतला जबरदस्ती केलेलं किस

मिका सिंगने राखी सावंतला जबरदस्ती केलेलं किस

Mika Singh-Rakhi Sawant Kissing Controversy: बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत यांचं किसिंग प्रकरण होय.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल- बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या वादग्रस्त प्रकरणांपैकी एक म्हणजे गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत यांचं किसिंग प्रकरण होय.वाढदिवसाच्या पार्टीत मिकाने आपल्याला जबरदस्ती किस केल्याचा आरोप राखी सावंतने केला होता. या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजली होती. हे प्रकरण आजही लोकांना लक्षात आहे. दरम्यान या प्रकरणात आता 17 वर्षानंतर एक मोठी अपडेट समोर येत आहे. इतक्या वर्षानंतर आता मिकाने कोर्टात धाव घेतली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, राखी सावंतला जबरदस्तीने किस केलेल्या प्रकरणात मिकाने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाला 17  वर्षे उलटली आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

मात्र अद्याप हे प्रकरण कोर्टात आहे. दरम्यान अचानक मिकाने उच्च न्यालयाचं दार का ठोठवलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिका सिंगच्या वकिलांनी उच्च न्यालयात आपली बाजू मांडत म्हटलं आहे की, राखी सावंत आणि मिका सिंगने हे प्रकरण आपापसात सामंजस्याने सोडवलं आहे. त्यामुळे या प्रकरण आता कोर्टातून कायमचं बंद केलं जावं. गायक आणि दलेर मेहंदी यांचा धाकटा भाऊ मिका सिंगने या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजवली होती. दरम्यान सोमवारी मिका सिंगचे वकील न्यायमूर्ती एएस आणि न्यायमूर्ती पीडी पाटील यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी न्यायधिशांसमोर आपला पक्ष ठेवत सांगितलं की, राखी आणि मिकाने हा वाद एकमेकांशी सामंजस्यात संवाद साधून मिटवला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता इथेच कायमचं बंद करण्यात यावं. (हे वाचा: इमरान हाश्मीच्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडलेला आलिया भट्टचा भाऊ; 8 वर्ष डेटिंगनंतर केलं लग्न ) तर राखी सावंतच्या वकिलांनी अभिनेत्री सध्या आपल्या कामात अतिशय व्यग्र असल्याचं सांगितलं. तसेच राखीच्या वकिलांनी असंही म्हटलं की हा वाद दोघांनी एकमेकांशी संवाद साधत मिटवला असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्यास आपला आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे. राखी सावंतकडून वकील पियुष पासबोला या प्रकरणावर काम करत होते. त्यांनी कोर्टात हेसुद्धा स्पष्ट केलं की, हे प्रकरण रद्द करण्यासंबंधात जे प्रतिज्ञापत्र आलं होतं ते रजिस्ट्री विभागातून गहाळ झालं आहे. त्यामुळे कोर्टात सादर करणं शक्य झालं नाही. याबाबतीत कोर्टाने पुढील आठवड्यापर्यंत नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं प्रकरण काय? तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 मध्ये राखी सावंत आणि मिका सिंग दोघेही चांगले प्रसिद्धीत होते. अशातच वाढदिवसाच्या पार्टीत मिकाने राखीला किस करत सर्वांनाच धक्का दिला होता. तर दुसरीकडे राखीने मिकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याचं सांगत खळबळ माजवली होती. हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. शिवाय या प्रकरणात राखीने पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात