प्रिन्स फिलिपच्या निधनानंतर पहिल्यांदाच समोर आले मेगन आणि मुलगा अर्ची

प्रिन्स हॅरी (Prince Harry) फिलिप यांच निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅलिफॉर्नियात परतले आहेत. तेव्हा मुलगा अर्ची सोबत मेगन आणि हॅरी स्पॉट झाले.

प्रिन्स हॅरी (Prince Harry) फिलिप यांच निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅलिफॉर्नियात परतले आहेत. तेव्हा मुलगा अर्ची सोबत मेगन आणि हॅरी स्पॉट झाले.

 • Share this:
  मुंबई 23 एप्रिल : लंडनच्या राजघराण्याचे (London royal family)  प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे राजघराण्यावर शोककळा पसरली होती. पण आता या घटनेनंतर पूर्व अभिनेत्री मेगन मार्कल (Meghan Markle) आणि मुलगा अर्ची (Archie)  हे पहिल्यांदाच स्पॉट झाले आहेत. प्रिन्स हॅरी (Prince Harry)  फिलिप यांचं निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅलिफॉर्नियात परतले आहेत. तेव्हा मुलगा अर्ची सोबत मेगन आणि हॅरी स्पॉट झाले. मेगन आणि हॅरी हे पुन्हा एकदा आई बाबा होणार आहेत. बेबी बंपसह मेगन स्पॉट झाली. फोटोंमध्ये मेगन ने आपल्या मुलाला अर्चीला कडेवर घेतलं आहे. नुकताच क्विन एलिजाबेथचा वाढदिवस होता पण प्रिन्स हॅरी ने वाढदिवसाला न थांबन पसंत केलं. प्रिन्स फिलिप यांच्या निधनानंतर मेगन मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ शकली नव्हती. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण येऊ शकत नसल्याच प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं होत.
  राजघराण्याचे आणि प्रिन्स हॅरी व मेगन चे संबध आता पूर्वीसारखे राहिले नसून त्यांच्यात असंख्य मतभेद निर्माण झाले आहेत. विशेषता हॅरी आणि मेगन हे कॅलिफोर्नियाला गेल्यानंतर व त्यानंतर ओप्रा विन्फ्रे (Oprah Winfrey) यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीनंतर हे संबध आणखीच दुरावले गेले आहेत.

  हे वाचा - 'आता खरी वेळ आलीये'; 15 ऑगस्टला देशभक्ती दाखवणाऱ्यांना सोनू सूदचा सल्ला

  मेगन ने या मुलाखतीत राजघराण्याविषयी असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला तर आपण पहिल्यांदा  गर्भवती असताना मला आत्महत्येसारखे विचार मनात येत होते असही ती म्हणाली. आपल्या होणाऱ्या मुलाच्या रंगाविषयी चर्चा केली जायची असही मेगन ने म्हटलं होत. राजघराण्याशी संबध जुळण्यापूर्वी मेगन एक अभिनेत्री होती. त्यावेळी ती (Suits) 'सूट्स' मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 50 हजार डॉलर्स मानधन घ्यायची असं एका वृत्तनुसार समजतं.
  Published by:News Digital
  First published: