ठाणे,30 मे: ठाणे महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून अभिनेत्री मीरा चोपडा (Meera Chopda)नं लस घेतल्याची माहिती समोर आली. यावर आता खुद्द मीरानं स्पष्टीकरण दिलं आहे. मीरानं ट्विटरवर ट्वीट करुन आपली भूमिका मांडली आहे. मीरा चोप्रानं बनावट आयडी बनवून लस घेतल्याचा आरोप नाकारला आहे.
मीरानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मी केवळ वॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी लोकांची मदत मागितली होती. जवळपास एक महिना पर्यंत केल्यानंतर एका सेंटरमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं होतं. नोंदणी करण्यासाठी पुरावा लागतो. त्यामुळे पुराव्यासाठी माझ्याकडून माझं आधारकार्ड घेण्यात आलं होतं.
My statement on the articles that has been coming out fr my vaccine shot!! pic.twitter.com/wDE70YHsMo
— meera chopra (@MeerraChopra) May 30, 2021
नेमकं काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये (TMC Parking Plaza Covid Center) सुपरवाझर असल्याचे सांगत मीरानं (Woman celebrity) लसीकरण घेतलं.
त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेतील भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली. तर पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या बाबत संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल असे तोंडी सांगितलं.
मीरा चोपडा (Meera Chopda) असे नाव असलेल्या ओळख पत्र आणि संबंधीत सेलिब्रेटीने लस घेतल्यानंतर स्वतःच इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर लस घेतल्याची पोस्ट टाकली. या सर्व प्रकरणा नंतर आता भाजपने पालिका प्रशासनावर आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सेलिब्रेटी मीरा चोपडा हिने हे फोटो डिलीट केलेत.
हेही वाचा- Petrol-Diesel Prices: जाणून घ्या मुंबईतील आजचे पेट्रोल- डिझेलचे दर
तर या प्रकरणाचा तपास करू आणि कोणी अशा प्रकारे लस दिली, संबंधीत सेलेब्रिटीचे वय किती आहे. तसेच संबंधीत संस्थेकडून तिला ओळखपत्र कसे देण्यात आले, याची माहिती घेतली जाईल. तसेच योग्य ती चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल असे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी तोंडी सांगितले आहे.
कोण आहे मीरा चोपडा?
मीरा चोपडा हल्लीच हॉटस्टारवरील द टॅटू मर्डर्स या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. मीरानं तमिळ आणि तेलुगू सिनेमांसह हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 1920 लंडन आणि सेक्शन 375 मध्येही ती दिसली. मीरा चोपडा अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि अभिनेत्री परिणीती चोपडा यांची चुलत बहिण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus