सोनालीने हा व्हिडीओ तेरे जैसे यार कहा...या गाण्यसह शेअर केला आहे. तर पूर्ण व्लॉग लवकरच ..सोबत रहा....आणि माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या कॅप्शनवरुन चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लावले आहेत. ती मैत्रीवर व्लॉग तयार करत आहे. बिग बॉस मराठी 3 कार्यक्रमात सहभागी होण्याआधी सोनालीने वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही तिची छोट्या पडद्यावरची पहिली मालिका होती. त्यानंतर सोनालीने 'देवमाणूस' मालिकेत वकीलाची भूमिका केली होती. सोनालीच्या या दोन्ही भूमिका खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यानंतर सोनाली दिसली ती थेट बिग बॉस मराठी 3 च्या घरात. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सोनालीने तिचा अस्सल कोल्हापूरी ठसका दाखवत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. जय दुधाणे आणि मीनल शाह (meenal shah) यांची नावे वेगळ्या अर्थाने घेतली जातात कारण हे कलाकार स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मराठी बिग बॉसमध्ये (meenal shah biography) दाखल झाले होते. मीनल एक उत्तम डान्सर आहे यासोबतच तिला अभिनयाची आवड देखील आहे. तिने मॉडेलिंग देखील केली आहे. 2017 साली एम टीव्हीच्या रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ती कंटेस्टंट बनून गेली होती. यात कठीण टास्क खेळून ती सेमी फायनलिस्टपर्यँत पोहोचली होती. रोडीज या रिअॅलिटी शोमुळे मिनलला तुफान प्रसिद्धी मिळाली अगदी सोशल मीडियावर तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या देखील वाढली होती. नानचाकू आणि मार्शलआर्टस्चे प्रशिक्षण घेतलेल्या मिनलला वेगवेगळ्या टास्कदरम्यान याचा खूप फायदा झाला होता. या शोनंतर मीनलने काही जाहीरातीत देखील दिसली. यामुळेच ती मनोरंजन क्षेत्राशी जोडली गेली. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले 26 डिसेंबर रोजी झाला. या ग्रँड फिनालेमध्ये विशालने बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफीवर नाव कोरले. तर स्प्लिटविला फेम जय दुधाणे हा उपविजेता ठरला. तर विकासला तिस-या क्रमांकावर, उत्कर्ष शिंदेला चौथ्या तर रोडिज गर्ल मीनल शाह हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.