शास्त्रीय संगिताला लाभलेला हिरा म्हणजेच तरुण गायक राहूल देशपांडे. इतके वर्ष आपण राहूलला गाणं गाताना पाहिलं होतं पण मी वसंतराव या सिनेमातून एक उत्तम अभिनेता म्हणून राहूल आपल्या समोर आला.
राहूल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. कधी तो शास्रीय गाणं सादर करत असतो तर कधी मुलगी रेणूकाबरोबर धम्माल मस्ती करताना दिसतो.
राहूलची पत्नी नेहा देशपांडे हिच्या वाढदिवसानिमित्ता राहूलनं तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तो रोमँटिक होताना दिसला.
'तू हसतेस तेव्हा फार सुंदर दिसतेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हॅपी बर्थ डे नेहूल्या!', असं कॅप्शन देत राहूलनं बायकोला शुभेच्छा दिल्यात.
राहूलच्या आयुष्यात त्याचा पत्नीचा मोठा वाटा आहे. मुलगी रेणूका आणि पत्नी नेहावर त्याचा विशेष जीव आहे.