मुंबई,, 20 जानेवारी - मागच्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन असेल किंवा महाराष्ट्राचे राजकारण सगळीकडे किरण माने प्रकरण (kiran mane controversy ) चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( Mulgi Jhali Ho) मालिकेत राजकीय भूमिका घेतल्याने काढून टाकल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. यानंतर वाहिनेने आपली बाजू स्पष्ट केली आहे. यानंतर काही संघटना असतील किंवा राजकीय नेते मंडळी किरण मानेंच्या (Kiran Mane) भूमिकेला पाठींबा देत आहेत. तर काहींनी विरोध देखील दर्शवला आहे. या सगळ्याता आता संभाजी ब्रिगेड मालिकेच्या सेटवर पोहोचली आहे.
संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) घोषणा देत किरण माने यांच्याविरूद्ध झालेल्या अन्यायाची दाद मागण्यात आली आहे. शिवाय आमच्या प्रश्नाची उत्तरे नाही दिलीत तर मालिकेचे शुटिंग देखील थांबवण्यात येईल अशी धमकी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदिप कणसे यांनी मालिकेच्या सेटवर उपस्थित असलेल्यांना दिली आहे. तसेच जोपर्यंत आमच्या प्रश्नाची उत्तरे दिली जाणार नाहीत तोपर्यंत शुटिंग चालू देणार नाही असं देखील संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. तसं जर केले तर कॅमेरे फोडून टाकू...याशिवाय तुम्ही असं एकाद्या कलाकाराल कसं काढू शकता असा जाब देखील विचारण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदिप कणसे यांनी फेसबुक लाईव्ह करत याची माहिती दिली आहे. आता मालिकेच्या निर्मात्यांनी याला काय उत्तर दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शिवाय मालिकेतील संबंधीतांशी संभाजी ब्रिगेडकडून फोनवर बोलणी करण्यात आली. यावेळी सेटवरील लोक शुटिंगच सांगत होते. तेव्हा संभाजी ब्रिगडकडून सांगण्यात आलं की, शुटिंग चालू देणार नाही. मालिका चांगला विचार देते. किरण मानेंमुळे सातारा भागात मालिका डोक्यावर घेतली जाते. तुम्ही असं त्यांना मालिकेतून काढले, असे अनेक प्रश्न यावेळी संभाजी ब्रिगेडकडून विचारण्यात आले व किरण माने यांना न्याय देण्याची मागणी केली.
वाचा-पुण्याचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर अभिनेत्याची पुणे पोलिसांसाठी पोस्ट
स्टार प्रवाह वाहिनीवर 'मुलगी झाली हो' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षक त्यांना पसंत करत होते. त्यांच्या दमदार अभिनयाचं सतत कौतुकही होत असे. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.