जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'श्रीवल्ली'चा गायक सिड श्रीरामने लावली 'Indian Idol Marathi'च्या मंचावर हजेरी

'श्रीवल्ली'चा गायक सिड श्रीरामने लावली 'Indian Idol Marathi'च्या मंचावर हजेरी

'श्रीवल्ली'चा गायक सिड श्रीरामने लावली 'Indian Idol Marathi'च्या मंचावर हजेरी

सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या ( Indian Idol Marathi latest episode) मंचावर दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा सिनेमातील श्रीवल्लीचा (srivalli ) गायक सिड श्रीरामने (sid sriram ) नुकतीच हजेरी लावल्याचे समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

 मुंबई, 26 फेब्रुवारी-  Indian Idol Marath: सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठी**( Indian Idol Marathi latest episode)** या रिएलिटी शोमध्ये स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सारेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स करत आहेत. त्यामुळे आता सुरांची बरसात, सुरांची चढाओढ स्पर्धेत दिसत आहे. त्यामुळे आता कोण विजेतेपद जिंकणार याची प्रेक्षकांप्रमाणेच परीक्षकांनाही उत्सुकता आहे. अजय-अतुल ही लोकप्रिय संगीतकार जोडी या स्पर्धेचं परीक्षण करताना दिसते. आतापर्यंत या मंचावर संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळीनं हजेरी लावली आहे. या मंचावर दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा सिनेमातील श्रीवल्लीचा (srivalli ) गायक सिड श्रीरामने (sid sriram ) नुकतीच हजेरी लावल्याचे समोर आलं आहे. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका पोर्टलने इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावरली ‘श्रीवल्ली’चा गायक सिड श्रीराम याचा अजय- अतुलसोबतच फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहतेही ‘श्रीवल्ली’चा गायक सिड श्रीरामला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा एपिसोड सोमवार, 28 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं सध्या तुफान गाजत आहे. या गाण्याचा गायक सिड श्रीराम याने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा भाषेत गाणी गायली आहेत. पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात श्रीराम गाण सादर करणार असून काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर अप्सरा आली या गाण्याचे कव्हर केले होते. ज्याला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात