जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : 'माझी तुझी रेशमीगाठ' मधून प्रार्थनानं घेतला ब्रेक, स्पेंड करतेय नवऱ्यासोबत क्वालिटी टाईम

Video : 'माझी तुझी रेशमीगाठ' मधून प्रार्थनानं घेतला ब्रेक, स्पेंड करतेय नवऱ्यासोबत क्वालिटी टाईम

Video : 'माझी तुझी रेशमीगाठ' मधून प्रार्थनानं घेतला ब्रेक, स्पेंड करतेय नवऱ्यासोबत क्वालिटी टाईम

माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्या वळणावर आहे अशातच प्रार्थनानं मालिेकतून ब्रेक घेतल्याचे समोर आलं आहे. सध्या प्रार्थना बेहेरे नवऱ्यासोबत ( abhishek jawkar ) लंडन ट्रीपचा आनंद घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मे- अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. प्रार्थना तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath )  मालिकेत नेहा कामतची भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे अशातच प्रार्थनानं मालिेकतून ब्रेक घेतल्याचे समोर आलं आहे. सध्या प्रार्थना बेहेरे नवऱ्यासोबत ( abhishek jawkar ) लंडन ट्रीपचा आनंद घेत आहे. तिचा लंडन ट्रीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रार्थना बेहेरेनं इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केलं आहे. ती या व्हिडिओमध्ये नवऱ्यासोबच क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सध्या ती नवरा अभिषेकसोबत लंडनमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, ट्रॅव्हल फॉर लव्ह. वाचा- ‘या’ सिनेमाचा भाग असणं अभिमानास्पद, प्रसाद ओकची ‘चंद्रमुखी’साठी नव्हे तर…. याशिवाय प्रार्थनानं हा व्हिडिओ सोनाली कुलकर्णीला टॅग करत म्हटलं आहे की, आम्ही येत आहे सोनाली..त्यामुळं प्रार्थना लंडनमध्ये सोनालीची भेट घेणार हे नक्की आहे. सोनाली आज कुणालसोबत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सोनालीला प्रार्थना आज खास सरप्राईज देणार हे नक्की आहे. याशिवाय सोनाली आज कुणालसोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे प्रार्थना त्याता सहभागी होण्यासाठी तर लंडनला गेली नाही ना असा प्रश्न देखील अनेकांना प़डला आहे.

जाहिरात

प्रार्थना बेहेरेचे अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांची ओळख झाली. त्यानंतर प्रार्थना आणि अभिषेक 14 नोव्हेंबर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रार्थना आणि अभिषेक मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून देखील ओळखले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात