मुंबई, 7 मे- अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (PRASAD OAK) त्याच्या चंद्रमुखी सिनेमामुळे मागच्य काही दिवसांपासून चर्चेत आहे. चंद्रमुखी सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता मात्र प्रसादच्या आणखी एका सिनेमानं त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सिनेमाच्या यशाबद्दल त्यानं एक पोस्ट करत माहिती दिली आहे. अभिनेत्री सोनाली कुसकर्णी हिची मुख्य भूमिता असलेल्या तिचं शहर होणं ( ticha shahar hona ) या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रसाद ओकनं म्हटलं आहे की,या चित्रपटाचा भाग असल्याचा अत्यंत अभिमान वाटतोय.. अत्यंत मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘फिल्म मार्केट’ मध्ये आमचा चित्रपट ‘तिचं शहर होणं’ ची निवड झालेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात येणाऱ्या तीन चित्रपटांपैकी तिचं शहर होणं हा एक चित्रपट आहे. ही निवड केल्याबद्दल महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख व निवड समितीतील सर्व सदस्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- Vikas Gupta B’day: बायसेक्शुअल असल्याचं समजताच आई-भावाने सोडलं….. तिचं शहर होणं या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन करण्याचा रसिका आगाशे चा हा पहिलाच प्रयत्न आहे. या सिनेमाची निर्मिती बीईंग क्रिएटिव्ह या कंपनीने केली आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी व्यतिरीक्त प्रसाद ओक, हेमांगी कवी, छाया कदम, ओंकार गोवर्धन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
माणसं शहरांची निर्मिती करत असतात, परंतु शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवन आणि मानसिकता तयार करण्यात या शहराची देखील मोठी भूमिका असते. वर्ग, जात, धर्म, संस्कृती, जीवनशैली, उच्चभ्रू वस्ती, झोपडपट्ट्या आणि गृहनिर्माण सोसायट्या अशा विविध रेषांवर विभागलेलं शहर, आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला समतोल शोधण्यासाठी सतत संघर्ष करत असतं. हा संघर्ष काहीवेळा मूक समाजाला आवाज देतो. ‘तिचं शहर होणं’ ही या आवाजाची कथा आहे. ही प्रत्येकाच्या शहराची, त्याच्या अस्तित्वाची गोष्ट आहे.