मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kajal Kate: परीच्या वयाची असल्यापासून शेफालीला करायचं होतं लग्न, काजलच्या आयुष्यातला खरा हिरो कोण आहे?

Kajal Kate: परीच्या वयाची असल्यापासून शेफालीला करायचं होतं लग्न, काजलच्या आयुष्यातला खरा हिरो कोण आहे?

काजल काटे म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेफालीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी नेमकी काय आहे?

काजल काटे म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेफालीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी नेमकी काय आहे?

काजल काटे म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेफालीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी नेमकी काय आहे?

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 16 जुलै: झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत शेफाली पात्र साकारणारी अभिनेत्री काजल काटे सध्या बरीच नावारूपाला येत आहे. अनेक वर्ष स्ट्रगल करून काजल आता शेफालीच्या रूपात ओळखली जात आहे. शेफालीचं मालिकेत तर समीरशी जोडी जमणार हे प्रेक्षकांना माहित आहे. पण शेफालीचा खऱ्या आयुष्यातला समीर कोण आहे माहित आहे का?

शेफालीची मालिकेतली लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे तशीच भन्नाट काजलची खऱ्या (Kajal Kate love story) आयुष्यातली लव्हस्टोरी पण आहे. काजलच्या नवऱ्याचं नाव प्रतीक कदम आहे. प्रतीक हा मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमसाठी फिटनेस कोच म्हणून काम करतो. काजल आणि प्रतीक यांची भेट चक्क मॅट्रिमोनियल साईट वर झाली आहे.

“मी टाईमपास म्हणून मैत्रिणीचं अकाउंट बघून मॅट्रिमोनियल साईटवर स्वतःच अकाउंट बनवलं. मला फक्त बघायचं होतं की मला किती जण पसंत करतात. मला काहीच दिवसात जवळपास चारशे रिक्वेस्ट आल्या. आणि मला घरून कोणताही ताण नव्हता, लग्नासाठी कधीच बळजबरी केली नव्हती. मी सहज एक रिक्वेस्ट पाहिली ऍक्सेप्ट केली आणि ती प्रतीक कदम या मुलाची होती. आम्ही भेटलो काही दिवसात मी त्याच्या घरच्यांना भेटले आणि मग मी लग्नाचा निर्णय घरच्यांना कळवला. मला लहानपणापासून अगदी मालिकेत परी ज्या वयाची आहे तेव्हापासून लग्नाबद्दल आकर्षण होतं. त्यावेळीच लग्नात काय करायचं हे मी ठरवून ठेवलं होतं. आणि प्रतीक माझ्या आयुष्यात खूप लकी ठरला. तो आयुष्यात आल्यावर मला चांगली कामं मिळाली. आणि आमचं लग्न झाल्यावरच त्याला ही मुंबई इंडियन्स कडून ऑफर आली. आम्ही एकमेकांना भेटणं आमच्यासाठी एकदम लकी ठरलं.” असं काजलने एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितलं.

हे ही वाचा- Shweta Shinde: श्वेता शिंदेची शूटिंगवाली लव्हस्टोरी, नवऱ्याशी पहिल्या भेटीत झाली खडाजंगी!

काजलने या मुलाखतीत आई वडिलांविषयीच्या आठवणी सुद्धा सांगितल्या. तिच्या आई वडिलांचं कोरोना काळात निधन झालं आणि तिच्या नवऱ्याने तिला खूप सांभाळून घेतलं असं ती सांगते. तिच्याकडे काम नसताना तिला नैराश्य आलं होतं तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला सपोर्ट केला तसंच आता मिळणारं यश बघून तो खुश आहे असं ती सांगते.

View this post on Instagram

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

मालिकेमुळे काजलला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. तिचे चाहते भेटल्यावर ती त्यांना पूर्ण वेळ देते आणि तेव्हा नवऱ्याची तारांबळ उडते अशी धमाल आठवण सुद्धा तिने या दरम्यान सांगितली.

First published:

Tags: Marathi actress, Zee Marathi, Zee marathi serial