जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा-अविनाशचं सत्य सगळ्यांसमोर उघड; यश-नेहाच्या नात्यात येणार का कायमचा दुरावा?

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा-अविनाशचं सत्य सगळ्यांसमोर उघड; यश-नेहाच्या नात्यात येणार का कायमचा दुरावा?

Mazhi Tuzhi Reshimgaath

Mazhi Tuzhi Reshimgaath

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका आता अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. येणाऱ्या काळात मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. त्याचा परिणाम यश आणि नेहाच्या नात्यावर होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑगस्ट : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नेहा आणि यशाच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री झाल्यापासून मालिकेत अनेक घडामोडी घडल्या आहेत. अविनाश हा नेहाचा पहिला नवरा  सत्य खेर यशला समजलं आहे. पण ते नेहाने न सांगता त्याला दुसरीकडून कळलं आहे त्यामुळे तो प्रचंड दुःखी झाला आहे. आणि नेहा-यशमध्ये दुरावा सध्या दुरावा आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तो ट्विस्ट सिम्मी काकू घडवून आणणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत प्रेक्षकांना नुकताच एक ट्विस्ट पाहायला मिळाला होता. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं होतं. सिम्मी याच गोष्टीचा फायदा घेऊन नेहाला त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. त्यामुळे नेहाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अविनाश नेहा आणि यशामध्ये दुरावा आणण्याचं काम करत आहे. आणि त्याला सिम्मी काकूंची साथ आहे. या दोघांचा डाव हातात   लवकरच यशस्वी होणार असं दिसतंय. हेही वाचा - Prasad oak : धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीदिवशी प्रसाद ओकनं केली मोठी घोषणा; ऐकून वाटेल अभिमान मालिकेचा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. त्यामध्ये यश आणि परिच्या वाढदिवशी नेहा आणि अविनाशच सत्य घरच्यांसमोर येणार आहे. सिम्मी काकू हे सगळं घडवून आणणार आहे. प्रोमोमध्ये सिम्मी यश आणि नेहासमोर घरच्यांना सगळं खरं सांगतेय. परिचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू असताना सिम्मी सगळ्यांसमोर अविनाशला ‘तू पारीसाठी, तुझ्या मुलींसाठी काही गिफ्ट आणलं नाहीस का?’ असं विचारते. तेव्हा आजोबांचा संताप होतो आणि ते सिम्मीला खडसावतात. ती नेहावर ‘तू यशला फसवलं आहेस, त्याच्या विश्वासघात केला आहेस’ असे आरोप करत आहे. यशसुद्धा काही न बोलता सिम्मीच बोलणं ऐकून घेत आहे. त्याचं आजोबांना आश्चर्य वाटत आहे.

जाहिरात

यशलाही सत्य ऐकून खूप मोठा धक्का बसला आहे. नेहाने त्याचा खूप मोठा विश्वासघात केला असं त्याला वाटत आहे. आता नेहा आणि अविनाशाबद्दल सगळं सत्य समजल्यावर आजोबा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवाय यशला झालेला गैरसमज नेहा कसा दूर करणार, त्यांचं नातं परत पाहिल्यासारखं कधी होणार या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात