मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची मोठी सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत म्हणाली....

‘माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची मोठी सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत म्हणाली....

स्वाती देवल

स्वाती देवल

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. याची माहिती खुद्द स्वातीनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, o6 डिसेंबर : झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे स्वाती देवल. तिने या मालिकेत खलनायिकी भूमिका साकारली आहे. स्वातीनं साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या भूमिकेमुळे स्वाती घराघरात लोकप्रिय झाली. या आधीही स्वातीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु खरी ओळख तिला या मालिकेतून मिळाली. अशी ही गुणी अभिनेत्री सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. याची माहिती खुद्द स्वातीनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

स्वातीनं हॉस्पिटल मधील फोटो शेअर करत  लिहिलंय की, ''नमस्कार मित्रांनो, कालच एक छोटी सर्जरी झाली. आता मी बरी आहे. स्वामींची कृपा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचे प्रेम यामुळेच हे शक्य झालं. स्वामी दत्त कृपा तर वेळोवेळी मिळते मला पण विशेष म्हणजे या वर्षी जाणत आहे. खूप लोकांचे आशीर्वाद मिळालेत. हे पुण्य असं कामी येतं. मी मनापासून तुमची आभारी आहे. अजून फक्त एक आठवडा काळजी घ्यायची आहे.''

हेही वाचा - 'इमली' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला ट्रकने दिली धडक; थोडक्यात बचावला जीव

स्वातीनं तिच्या पुढे पोस्टमध्ये लिहिलं की, ''पणं खरंच आपणच आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. दुर्लक्ष करू नका. वेळच्या वेळी उपचार करायला हवे. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे. पूर्वी जंक फूड म्हणजे आई रोजच्या जेवणाव्यतिरिक्त जे बनवायची ते असायचं. म्हणजे फक्त रविवारी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी वगैरे. पण या सर्व गोष्टी घरीच बनवलेल्या असायच्या.'

''आज लोक घरी जेवण करायचा कंटाळा करतात आणि बाहेरून आणतात. मोठे झालो अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधले पदार्थ मित्र मैत्रिणीबरोबर चाखायची सवय लागते आणि मग ती जात नाही. कधीतरी हे ठीक आहे. पण चटकदार खायची जिभेची सवय जाऊच शकत नाही. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करण्याचा कंटाळा कसला हो. मी आजही शूटला स्वतः डबा नेते पण मी प्रचंड फुडी असल्यानं विविध रेस्टॉरंटमधले पदार्थ खाऊन ते घरी बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथल्या शेफना भेटून विचारून यायची सवय. त्यामुळेच हे सगळं झालं. बरं जेवणाच्या वेळा नियमीत नाहीत म्हणूनही गे सगळं झालं. कुठे थांबायचं, शरीरचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वतःला समजयला हवं.''

View this post on Instagram

A post shared by Swati Deval (@swati.deval)

याच पोस्टमध्ये स्वातीनं अभिनेत्री रुपाली भोसलेचाही उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी रुपालीचीही शस्त्रक्रिया झाली होती. तिचाही उल्लेख स्वातीनं केला. ती म्हणाली की, काही दिवसांपूर्वी मैत्रीण रुपाली भोसलेची पोस्ट वाचली. ती वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला. धन्यवाद. या पोस्टमध्ये स्वातीनं तिची ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली तिथल्या डॉक्टरांचे, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्याचे आभार मानले आहेत. पोस्टच्या शेवटी स्वातीनं तिचा नवरा आणि संगीतकार तुषार देवल याचेही आभार मानले आहेत.

तिनं लिहिलं की, ''तुषार तर सेवेत हजर होता. असा नवरा मिळायला भाग्य लागतं. पण खरंच तुषारनं अगदी पेज बनवून ती भरवण्यापर्यंत, पाय दाबून देणं अगदी सर्व काही केलं. तो माझ्या सेवेत हजर होता.. लव्ह यू तुष्की.' स्वाती रुग्णालयात असल्याचं समजल्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कमेन्टमधून ती लवकर बरी व्हावी, अशा शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, स्वाती देवलनं कुंकू, कळत नकळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फू बाई फू, पुढचं पाऊल यांसह अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.''

स्वातीनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आता लवकर बरी झाली कि पुन्हा मालिकेत  परतेल.

First published:

Tags: Marathi actress, Zee Marathi