मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तू तर महाराष्ट्राचा Ranveer Singh'; अभिजीत खांडकेकरचा हटके LOOK चर्चेत

'तू तर महाराष्ट्राचा Ranveer Singh'; अभिजीत खांडकेकरचा हटके LOOK चर्चेत

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर नेहमीच आपल्या अभिनयामुळे तर चर्चेत असतोच. मात्र अलीकडे तो आपल्या स्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असतो.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 जुलै- कलाकार म्हटलं की स्टाईल ही आलीच. स्टाईल (Style) असो किंवा लुक (Look) दोन्ही बाबतीत सर्व तरुण पिढी या कलाकारांना फॉलो करत असते. या कलाकारांच्या प्रत्येक लुकची चर्चा आणि कौतुकदेखील होतं असतं. मात्र काही कलाकार असे आहेत ज्यांचा आगळावेगळा स्टाईल सर्वांनाचं चक्रावून टाकेल. हा स्टाईल सामान्य लोकांच्या अवाक्याबाहेरचाचं म्हणावा लागेल. या स्टाईलमुळे बऱ्याचवेळा हे कलाकार सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होतं असतात. तर काहींची खिल्लीसुद्धा उडवली जाते. यामध्ये अभिनेता रणवीर सिंगचं नाव सर्वात आधी येतं. तो नेहमीच आपल्या हटके लुकमुळे चर्चेत असतो. रणवीरसारखंचं मराठीमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijit Khandkekar) असा हटके फंडा वापरला आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर नेहमीच आपल्या अभिनयामुळे तर चर्चेत असतोच. मात्र अलीकडे तो आपल्या स्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिजीतने पारंपरिक साडीपासून तयार केलेला पोशाख परिधान करत एक लांबलचक पोस्ट टाकली होती. तसेच स्त्री आणि पुरुषांचे कपडे विभागू नयेत असं मतही व्यक्त केल होतं. त्यांनतर आत्ता पुन्हा एकदा अभिजीतने एक हटके लुक केला आहे.

(हे वाचा: 'पवित्र रिश्ता 2' मध्ये मराठमोळ्या अभिज्ञा भावेची वर्णी; साकारणार ही भूमिका )

अभिजीतने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे. अभिजीतच्या या हटके लुकवरून त्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. युजर्सनी ट्रोल करत त्याला विविध कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे, अजून एक नमुना, तर काहींनी त्याची तुलना बॉलिवूड स्टार रणवीर सिंगसोबत केली आहे. काही युजर्सनी कमेंट करत त्याला मराठीतील रणवीर सिंग तसेच महाराष्ट्रचा रणवीर सिंग म्हटलं आहे.

First published:

Tags: Marathi entertainment