मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पवित्र रिश्ता 2' मध्ये मराठमोळ्या अभिज्ञा भावेची वर्णी; दिसणार महत्वाच्या भूमिकेत

'पवित्र रिश्ता 2' मध्ये मराठमोळ्या अभिज्ञा भावेची वर्णी; दिसणार महत्वाच्या भूमिकेत

झी टीव्हीवर प्रसारित झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती.

झी टीव्हीवर प्रसारित झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती.

झी टीव्हीवर प्रसारित झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 जुलै- ‘पवित्र रिश्ता’ ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका होती. अफाट लोकप्रियता आणि उत्तुंग यशानंतर या मालिकेचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा फर्स्ट लुकसुद्धा आपल्या समोर आला आहे. अशातच अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) मध्ये मराठमोळ्या अभिनेत्री अभिज्ञा भावेचासुद्धा(Abhidnya Bhave) समावेश झाला आहे. त्यामुळे चाहते खुपचं खुश आहेत.

झी टीव्हीवर प्रसारित झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती. अनेक वर्षे ही मालिका टीव्हीवर चालली होती. या मालिकेने अनेक नव्या कलाकरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. याचं मालिकेमुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेला स्टार बनवलं होतं. याच सर्व यशानंतर आत्ता मालिकेचा दुसरा भाग आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीचं याची घोषणादेखील झाली होती. नुकताच मालिकेचा नवा लुक सर्वांच्या समोर आला आहे. त्यामुळे चाहते खुपचं उत्सुक झाले आहेत.

(हे वाचा:'पवित्र रिश्ता 2' चा फर्स्ट लुक VIRAL; चाहत्यांना झाली सुशांतची आठवण)

तसेच अनेक आनंदाची माहिती समोर आली आहे. ‘पवित्र रिश्ता 2’ सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेची वर्णी लागली आहे. नुकताच एका इन्स्टापेजवर याबद्दलची माहिती देण्यात आली होती. तर ती पोस्ट रीपोस्ट करत त्यांचे आभार मानत अभिज्ञाने या माहितीची पुष्ठी केली आहे. त्यामुळे अभिज्ञाचे चाहते खुपचं खुश आहेत.

(हे वाचा: सलमान खानचे 'हे' चित्रपट ठरले होते एकदम फ्लॉप; चाहत्यांनाही बसला होता धक्का )

‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये अभिज्ञा एका महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. तिच्या भुमिकेबद्दल अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही. तसेच अभिज्ञाने अनेक मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी तिने हिंदी मालिकेतसुद्धा पदार्पण केलं आहे. मात्र आत्ता चाहते अभिज्ञाला ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये बघण्यासाठी खुपचं उत्सुक झाले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress